सेवा निवृत्त कर्मचारी संघ उरण तर्फे आवरे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )सेवा निवृत्त कर्मचारी संघ उरण तर्फे उरण तालुक्यातील आवरे शाळेत 4 जुलै रोजी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वेता दबडे यांनी शालेय जीवनात मुलांना आनंदाने शिक्षण कसे द्यावे याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्राचार्य डाॅ.साहेबराव ओहळ,संध्याराणी ओहाळ,वसंत कुडव,सुनिल पाटील,सुरेश भोईर,बळीराम थळी आदी मान्यवर उपस्थित होते.संजय धबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच निराताई पाटील ,मुख्याध्यापक बबन पाटील,अरुणा तिरमाळी ,निर्भय म्हात्रे,श्री.आहेर,गणेशप्रसाद गावंड,सौ .कोल्हे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सोमनाथ म्हात्रे ,शंकर पाटील,प्रमोद म्हात्रे,अलका गावंड ,सुवर्णा म्हात्रे,प्रतिक्षा गावंड,माई म्हात्रे,रुपाली चव्हाण उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जपत सेवा निवृत्त कर्मचारी संघाने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या मुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी वेगळाच आनंद दिसून आला.