पैसे दुप्पट करण्याच्या बहाणाने उरण मधील फसवणूक झालेले नागरिक काढणार 16 जुलै रोजी पिरकोन गावात मोर्चा.
पैसे दुप्पट करतो म्हणून नागरिकांनी दिले लाखो रुपये.नागरिकांची झाली फसवणूक.फसवणूक झालेले नागरिक एकत्र येत 16 जुलैला काढणार मोर्चा.एजंट लोकांना विचारणार जाब.सोशल मीडियावर मेसेज व्हायरल.पोलिसांतर्फे फसवणूक झालेल्या नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन.पोलीस प्रशासनातर्फे नोटीस जारी.
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पिरकोन गावातील सतीश गावंड यांनी पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने अनेक लोकांची फसवणूक केली आहे. असा आरोप नागरिकांचा असून पैसे दुप्पट करण्याच्या फसवणूक बाबत सतीश गावंड यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. आता हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे मात्र एका एका व्यक्तीने ५० दिवसात पैसे दुप्पट होईल या आमिषाने लाखो, करोडो रुपये गुंतविले आहेत. काही लोकांनी आपली शेती, घरे, दागिने गहाण ठेवून त्याचे पैशात (चलनी नोटात )रूपांतर करून हे पैसे पिरकोन मधील एजेंट कडे दिले आहेत. एजेंटच्या मार्फत हे पैसे सतीश गावंड यांच्याकडे पोहोचायचे व ५० दिवसानंतर त्या त्या व्यक्तीला सतीश गावंड कडुन एजेंटला व एजेंट कडुन त्या त्या व्यक्तीला हे पैसे मिळायचे. सुरवातीला अंदाजे हे २ वर्षे व्यवहार चालला. लोकांना डबल पैसे मिळाले मात्र नंतर सतीश गावंड यांना अटक झाल्यावर ज्या ज्या लोकांनी पैसे गुंतविले होते त्यांना मात्र व्याज मिळाले नाही. नंतर लोकांनी व्याज नको मुद्दल तरी दया अशी मागणी एजेंट कडे केली. मात्र आमच्या ईथे पैसे नाहीत असे सांगून एजेंट लोकांनी हात वर केले. सतीश गावंड सुद्धा लोकांना भेटत नाहीत आणि एजेंट लोक सुद्धा कोणाला भेटत नाहीत. सतीश गावंड व त्यांचे एजेंट यांचा फोन बंद असल्यामुळे गुंतवणूकदार गोंधळले आहेत. आता पैसा मागायचे कोणाकडे असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. व्याजही नाही आणि मुद्दलही नाही अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे. अगोदरच शेती, घर, बंगला, सोने लोकांनी बँकेत तसेच खाजगी उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडे गहाण ठेवले आहे. त्यामुळे आपल्याजवळ होते ते सर्व नागरिक गमावून बसले आहेत. संतापलेले सर्व नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतीश गावंड व एजेंट लोकांना जबाबदार धरत सतीश गावंड व एजेंट लोकांच्या घरावर मोर्चा काढायचे निश्चित केले आहे.व सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरिकांकडुन सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन सुद्धा केले जात आहे.फसवणूक झालेले नागरिकांनि एकत्र या व एजेंटला जाब विचारा असा मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या अनुषंगाने उरण पोलीस स्टेशन मार्फत कोणीही कायदा हातात घेउ नका असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.फसवणूक झालेल्या नागरिकांनी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयचे नोटीस देखील काढण्यात आले आहे.
पोलिसांनी काढलेल्या नोटीसी मध्ये सांगण्यात आले आहे की उरण पोलीस ठाणे हद्दीतील पिरकोन गावातील व्यक्तीने कमी पैशात जास्त प्रमाणात परतावा देण्याचे आमिष देवून लोकांची फसवणूक केली आहे त्यापूर्वी उरण पोलीस ठाणे हद्दीतील गावागावातील ग्रामपंचात कार्यालयात सरपंच, ग्रामस्थ व बॅनर लावून पोलीस ठाणे येथे संबंधीत व्यक्तीविरूध्द तकार दाखल करणेबाबत आवाहन करण्यात करण्यात आले होते. त्याबाबत एका व्यक्तीने पिरकोन गावातील व्यक्तीविरूध्द उरण पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सध्या व्हॉटस्अप गृपवर पिरकोन गावातील व्यक्तीकडे एजेंट लोकांन मार्फत ठेविदाराने गुंतवणुक केले आहे व सदर व्यक्तीने एजंट यांचेकडे पैसे ठेवले असून एजंट लोक गुंतवणुकदार यांना पैसे परत न देता, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सदर बाबत पिरकोन येथील आरोपी व्यक्तीने एजंट कडून १४ जुनला एजंट कडून पैसे घेणेबाबत सांगून पुन्हा १० जुलै २०२३ तारीख गुंतवणुक दारांना दिली आहे. जर १० जुलै २०२३ तारखेला पैसे न मिळाल्यास १६ जुलै २०२३ रोजी मोठया संख्येने कोप्रोली नाक्यावर गुंतवणुकदारांनी उपस्थित राहून पिरकोन गावातील सर्व एजेंट यांचे राहते घरी जावून पैसे वसूल करणेबाबत व्हाट्सअप मॅसेज मध्ये नमुद केले आहे.
उरण पोलीस ठाणेकडून हद्दीतील ग्रामस्थांना जाहिर आवाहन करण्यात येते की, व्हॉटस्अप द्वारे प्रसारीत करण्यात येणारा मॅसेज हे लोकांना एकत्र जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा आहे. ज्या लोकांनी गुंतवणुक केली आहे, त्यांचे अगोदरच नुकसान झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीताविरूध्द गुन्हे दाखल होवू शकतात. त्यामुळे अडचणी मध्ये वाढ होणार आहे.
गुंतवणुकदारांनी एजंट लोकांनी पैसे परत दिले नाही म्हणून कायदा हातात न घेता उरण पोलीस स्टेशनला येवून संबंधीतांविरूध्द तकार दाखल करून न्यायीक व सनदशीर मार्गाचा अवलंब करावा. सदर आवाहनानुसार कोप्रोली नाक्यावर दिनांक १६ जुलै २०२३ रोजी गैर कायदयाची मंडळी जमवू नये अन्यथा कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असे आवाहन नोटिशीच्या माध्यमातून सतिश निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई यांनी फसवणूक झालेल्या नागरिकांना केले आहे.