मुसळधार पावसामुळे उरणमधील जनजीवन विस्कळीत.अनेक गावात पुरसदृश परिस्थिती निर्माण.

घरात पाणी घुसून मालमत्तेचे प्रचंड नुकसान, मात्र कोणतेही जीवितहानी नाही.आपत्कालीन यंत्रणेचे अपयश.उरण दि. 19 (विठ्ठल ममताबादे ) गेल्या 3 दिवसापासून रायगड जिल्हयात सर्वत्र मुसळधार पाउस पडत असून उरणमध्येही मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसाचा अनेक गावांना तडाखा बसला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उरण तालुक्यातील चिरनेर, विंधणे , भेंडखळ,नवघर,मोठी जुई,जसखार, कंठवली,रांजणपाडा, कोप्रोली,खोपटा, कळंबुसरे,जेएनपीटी टाउन शिप, डाउरनगर, नागाव,म्हातवली कुंभारवाडा आदि ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घूसून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सध्या तरी कोणतेही जिवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे भातशेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली असून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. उरण शहरातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते काही रस्त्यांना तर नदीचे स्वरूप आले होते.दरवर्षी उरण तालुक्यातील विविध गावांना पूर येतो. घरात पाणी घूसून मालमत्तेचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते.मात्र या महत्वाच्या समस्यावर शासनाला उपाययोजना करण्यात अपयश आले आहे.दरवर्षी उरणमधील विविध गावात पावसामुळे घरात पाणी घूसते. यंदा चिरनेर गावात 350 हून अधिक घरात पाणी घुसले आहे.शासनाने आखलेल्या विविध योजनांचा पार फज्जा उडाला आहे. उरण तालुक्यात दरवर्षी पूर येतो.लोकांची घरे पाण्याखाली जातात. मात्र घरे पाण्याखाली जाऊ नये यासाठी शासना कडून कोणतेही ठोस पाउले उचलली जात नाहीत. आप्तकालीन उपाययोजना विषयी जेवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला पाहिजे तेवढया प्रमाणात जनजागृती होतना दिसून येत नाही. आपात कालीन यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानतात. हे उरण मध्ये आलेल्या पूर परिस्थितीवरून दिसून येतो.शहरांचे शिल्पकार मिरवून घेणाऱ्या सिडकोच्या नियोजनचाही पार फज्जा उडाला आहे.उरणचा नियोजनबद्ध विकास करण्यात सिडको प्रशासन अपयशी ठरली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालय ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक असूनही या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. पुर परीस्थिती निर्माण झालेल्या गावातील नागरिकांनी आपली समस्या शासनाकडे मांडली आहे. मात्र प्रशासन या समस्यांची दखल गांभीर्याने घेत नाही त्यामुळे या सर्व कारणामुळे उरणला नेहमी पुराचा तडाखा बसत असून नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे.काही जागरूक पत्रकारांनी जिल्हा प्रशासनाकडे या बाबत तक्रार केल्यानंतर उरण मधील प्रशासन खडबडून जागे झाले. व प्रशासकीय अधिकारी कामाला लागले.प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर व शासकीय अधिकाऱ्यां विरोधात जिल्हा प्रशासनाला कळविल्या नंतर अधिकारी, तलाठी,कोतवाल ग्रामसेवक यांनी त्या त्या भागात जाऊन घटना स्थळाची पाहणी केली आहे. या संदर्भात तहसिलदार उद्धव कदम यांना विचारले असता सर्व परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपात कालीन यंत्रणा सज्ज आहे. अशी माहीती तहसिलदार उध्दव कदम यांनी दिली आहे.

Google Ad