बॅनरबाजी’मुळे भोकर शहराचे विद्रुपीकरण… नागरिक दुकानदारांनी केली दंडात्मक कार्यवाही ची मागणी

भोकर ( प्रतिनिधी ) कुठल्याही शहराची निर्मिती करताना नगररचना विभाग महत्वाची भूमिका बजावतो रस्ते कुठून असावे, पार्किंगची व्यवस्था कशी असावी यासह अनेक बाबी असतात मात्र,या नियमांना डावलले जात असल्याचे दिसून येत आहे.

सध्या भोकर शहरात खासगी जाहिरातदारांच्या फलकबाजीमुळे दुकानदाराचे व शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण झाले आहे शहरात सर्वत्र भाऊंचा वाढदिवस अन खाजगी क्लासेच्या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे काही खासगी जाहिरातदारांनी आपल्या जाहिरातीचा टेंभा डॉ आंबेडकर चौकात मिरविल्याने दुकान व शहर विद्रुप होत आहे याकडे स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही तसेच शहरात अनेकदा राजकीय फ्लेक्सबाजी होत असते खरं पाहिले तर प्रत्येक पक्षातील नेत्यांनी ठरवले तर आपले शहर सुंदर शहर म्हणून ओळख निर्माण करू शकते मात्र,शहरात सर्रासपणे नेत्यांचीच बॅनरबाजी चालू असते त्यामुळे शहर विद्रुपीकरणात नेत्यांचाही मोठा हातभार दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे भोकर शहर फलकांचे शहर बनले या शहराच्या सौंदर्याला खीळ घालणार्‍या या जाहिरातदारांना आवर घालण्याची मागणी दुकानदार व नागरिकांनी प्रशासक तथा तहसीलदार राजेश लांडगे यांना निवेदनाव्दारे केली आहे निवेदनावर दयाराम जोशी,रेहान सरवरी,निलेश तुपत्तेवार,अविनाश मटकमवड ,संजीव रेड्डी चितंनपले,अनीश भोजानी हाजी दिलावर,पवन चुनगुरवाड,गजानन चौथे,मारोती बुटनवाड अदिच्या सहया आहेत पालिका प्रशासनाने या जाहिराती तातडीने काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी जोर धरत आहे

Google Ad