रुग्णमृत्यू प्रकरणी गोजमगुंडे हॉस्पिटलवर कारवाई करा रुग्ण हक्क संरक्षण समितीची जिल्हाअधिकारी यांना मागणी
लातूर:- लातूर येथील अस्थिरोग तज्ञ डॉ गोजमगुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये बुधोडा येथील तरुण रमण अलगुले याचा शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाला. सदर मृत्यू हा डॉ गोजमगुंडे, व भुलतज्ञ डॉ अतिक शेख यांच्या निष्काळजीपणा मुळे झाला आहे असा रुग्णांच्या नातेवाईकांनीं आरोप करत गांधी चौक पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे .तक्रार देऊन सात दिवस झाले आहेत. परंतु सदर प्रकरणाची पोलीस प्रशासनाने कसलाच तपास आणि चौकशी कारवाई केलेली नाही. यामुळे मयत रुग्णाला न्याय मिळावा यासाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी यांच्या नेतृत्वा खाली लातूर येथे आजच रुजू झालेल्या नूतन महिला जिल्हाअधिकारी मा वर्षाजी ठाकूर यांना प्रत्यक्ष भेटून घटनेची सविस्तर माहिती देऊन संबंधित पोलीस प्रशासनाला गोजमगुंडे हॉस्पिटलची तात्काळ तपासणी व चॊकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी निवेदना द्वारे केली यावेळी मा जिल्हाअधिकारी यांनी रुग्ण हक्क संरक्षण समितीला सदर गंभीर प्रकरणाची चोकशी व तपास करण्यासाठी तात्काळ संबधित पोलीस व आरोग्य प्रशासनाला आदेश देण्यात येतील असे आश्वासन समितीला दिले यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हणमंत गोत्राळ, महिला प्रदेशअध्यक्ष रेणुका बोरा, मराठवाडा सम्पर्क प्रमुख प्रा. शंकरराव सोनावणे, लातूर जिल्हाअध्यक्ष दिपक गंगणे, जिल्हा उपाध्यक्ष राम चिलमे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन शिंदे,कमलाकर कांबळे आदी समिती पदाधिकारी उपस्थित होते