माणसं मेल्यावर भोकर ग्रामीण रूग्णालयात औषधी येणार का? औषधांचा प्रचंड तुटवडा,संतापजनक चित्र

भोकर (तालुका प्रतिनिधी)भोकर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य यंत्रणा सध्या औषधांविना आजारी पडली आहे.मागील पाच ते सहा महिन्यांपासून औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या तर लहान मुलांचे कसलेच औषधी उपलब्ध नाहीत गरोदर मातांना रक्त वाढीसाठी लागणारे टोनिक बॉटल उपलब्ध नाही.टिबीच्या गोळ्या.शुगरच्या गोळ्या व इतर आजारांवर उपयोगी गोळ्या टोनिक बॉटल उपलब्ध नाही.गेल्या काही दिवसांपूर्वी रूग्णालयात गोळ्या वाटप केल्या असे फोटो वॉयरल होत्या पण रूग्णालयात एक्सफाईट झालेल्या गोळ्या भरपूर प्रमाणात मिळतील.भोकर ग्रामीण रूग्णालयात जिल्हा नियोजन समितीने निधीही दिला असेल;परंतु अद्यापही खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यासाठी आरोग्य विभाग काय मुहूर्त पाहतेय का?तसेच एखादा बळी गेल्यावर औषधी येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात माहिती अशी की भोकर ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे; परंतु मागील पाच ते सहा महिन्यांपासून भोकर ग्रामीण रूग्णालयात कोणत्याही औषधी नाहीत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने अद्यापही याबाबत काहीच कारवाई झालेली नाही.आरोग्य विभागाकडून केवळ तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगत हात झटकले जात आहेत;परंतु याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत आहे. औषधांविना एखादा बळी गेल्यावर आरोग्य विभाग, प्रशासन आणि शासन औषधी खरेदी करणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. औषधी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.या औषधींचा तुटवडा गरोदर मातांना रक्त वाढीसाठी लागणारे टोनिक बॉटल उपलब्ध नाही.टिबीच्या गोळ्या.शुगरच्या गोळ्या व इतर आजारांवर उपयोगी गोळ्या टोनिक बॉटल उपलब्ध नाही. आवश्यक असणारी औषधे व गोळ्या नाहीत. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासाठी आवश्यक असणारे प्रोमीथीयाझीन, पेन्टाझीशीन हे इंजेक्शनही नाही. तसेच जखम झाली तर पट्टी करण्यासाठी ड्रेसिंग मटेरियलपण नाही.

‘”रूग्ण हक्क संरक्षण समिती”ने मांडले वास्तव

‘”रूग्ण हक्क संरक्षण समिती”ने औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार वास्तव मांडलेले आहे.औषधी नसल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. सरकारी रुग्णालयात केवळ तपासणी केली जात असून, औषधी मात्र खासगी मेडिकलवरून खरेदी करावे लागत आहेत. याचा आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे.तसेच जखम झाली तर रक्त पुसायला साधा बोळाही नाही, हेदेखील मांडले होते.त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत तांत्रिक अडचणी दूर करून आरोग्य विभाग खरेदीसाठी कशाचा मुहूर्त पाहत आहे ? याबाबत प्रश्न आहे..भोकर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.

Google Ad