राजकीय परिस्थिती पाहता दलित मुस्लिम एकत्र येणे गरजेचे—-अॅड गफ्फार खादरी
भोकर (लतीफ शेख) देशाची व राज्याची परिस्थिती पाहता दिवसेंदिवस दलित आणि मुस्लिम आवर अत्याचार वाढत आहेत राजकीय पाठबळ नसल्यामुळे पिडीतांना न्याय मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आपले राजकीय वर्चस्व वाढवून दलित मुस्लिमांना न्याय मिळवून देण्यासाठी दलित मुस्लिमांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अॅड गफार कादरी यांनी व्यक्त केले भोकर येथे एम आय एम पक्षाच्या वतिने आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते
दि 22जुलै रोजी एम आय एम शाखा भोकर च्या वतीने हालाते हाजरा या विषयावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेला प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएम पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला, जिल्हाध्यक्ष मिर्झा अमजद बेग ,नांदेड महानगराध्यक्ष सादर चाऊस, नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाबा खान सह आदि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती पुढे बोलताना अॅड गफ्फार कादरी म्हणाले की गेल्या दोन महिन्यापासून मनिपुर जळत आहे देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री यावर गप्प आहेत राज्य सरकार असो केंद्र सरकार असो दलित आणि मुस्लिमजावर अत्याचार झाल्यास जसे गप्प राहते तसेच प्रकारे मणिपूर येथे होत असलेल्या दंगली वर ही गप्प आहे असेही ते म्हणाले नांदेड जिल्ह्यातील आगामी निवडणूका एम आय एम पक्ष लढवणार असून कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करून एमआयएम पक्षाची स्थिती आणखी मजबूत करावी लवकरच आपल्या भोकर शहरात एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदोद्दिन ओवेसी यांची जाहीर सभा मी माझ्या नियोजनाखाली लावतो असेही ते म्हणाले सभा यशस्वी करण्यासाठी एम आय एम पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष सय्यद जुनेद पटेल, माजी तालुका अध्यक्ष करीम करखेलीकर, शहर अध्यक्ष निजाम बाबा, इर्शाद खान,अहेमद अली,सोहेल रजा,जमील पठान,अवेस पटेल सह आदिणी परिश्रम घेतले