भोकर तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थी वाऱ्यावर….

भोकर (तालुका प्रतिनिधी)तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळा मध्ये शिक्षक मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याने काही आश्रम शाळांमध्ये शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
भोकर तालुक्यात शासकीय आदिवासी आश्रम शाळा7 असून ग्रामीण भागातील आदिवासी व इतर नियमात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासह भोजनाची व राहण्याची व्यवस्था केली जाते त्या ठिकाणी असलेले शिक्षक मुख्यालय राहणे बंधनकारक आहे शिक्षकांनी तिथे निवासी राहायला पाहिजे व संस्थाचालकांनी त्यांना राहण्याची व्यवस्था करून देणे गरजेचे आहे मात्र अनेक आश्रमा शाळा मध्ये शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत काही ठिकाणी शिक्षक राहत असतात मात्र बहुतांश आश्रम शाळांमधील विद्यार्थी मात्र वाऱ्यावरच आहेत आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी व मुली निवासी राहत असतात त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सदरील आश्रम शाळेतील शिक्षकांवर आहे,काही भागात माळरानामध्ये आश्रम शाळा आहेत तिथे विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी काय राहणार आहे,रात्रीच्या वेळी काही अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी काय करावे?असा गंभीर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
शासनाच्या नियमानुसार निवासी आश्रम शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना योग्य आहेत का?निवासाची व्यवस्था योग्य आहे का?भोजन योग्य दिले जाते का?शिक्षणाबाबत शिक्षक किती गांभीर्याने घेतात?शैक्षणिक दर्जा कसा काय आहे? या सर्व बाबींची चौकशी आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांचे मार्फत होणे गरजेचे आहे शिक्षक मुख्यालयी राहत नाही ही गंभीर बाब सुद्धा किनवट प्रकल्प अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे

Google Ad