नांदेडच्या जिल्हा न्यायालयात बोगस भरती.. त्या बोगस भरती विरुद्ध मुंबई उच्च न्यायालया समोर अमरण उपोषण करणार;-ॲड. मो.सलीम..
नांदेड जिल्ह्यातील न्यायालयात बोगस भरती झाल्याची तक्रार मो.सलीम यांनी मुंबईउच्च न्यायालयात केली आहे.
दिनांक ०६/०३/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत जालना, नांदेड, उस्मानाबाद. व वाशीम. या जिल्ह्यांकरिता एक मुख्य विध सहाय. बचाव पक्ष विधिज्ञ, दोन उप-मुख्य विध सहाय बचाव पक्ष विधिज्ञ व चार सहाय्यक विध सहाय बचाव पक्ष विधिज्ञ या पदांची भरती करण्याकरीता जाहीरात देण्यात आली होती.
सदरील भरती करिता मुलाखात समीती व निवड समिती मध्ये १). श्री नागेश व्ही. न्हावकर प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड तथा अध्यक्ष, नादेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, २). श्री एस. ई. बांगर, जिल्हा न्यायाधीश-1, नांदेड, ३). श्री सी. व्ही. मराठे, जिल्हा न्यायाधीश-2, नांदेड ४). श्रीमती आरआर पटवारी, जिल्हा न्यायाधीश-3, नांदेड ५). श्री रणजीत देशमुख, जिल्हा सरकारी वकील नांदेड ७). श्रीमती ए.के. मांडवगडे प्रभारी सचिव, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे सदस्य होते.
निवड समितीतील सदस्यांनी आरती राधाकिशन बहेती. हिच्यासोबत संगणमत करून, गैरमार्गाचा वापर करून, ती उप-मुख्य विध सहाय बचाव पक्ष विधिज्ञ या पदाकरीता पात्र नसतांना सुद्धा अशा अपात्र उमेदवाराची निवड उप-मुख्य विध सहाय बचाव पक्ष विधिज्ञ या पदाकरिता केलेली आहे, अशा आशयाची तक्रार ॲड. मो. सलीम यांनी वज़िराबाद पोलीस स्टेशन नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिलेली आहे. त्याबाबत ॲड. मो. सलीम यांच्याशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितले कि, समाजातील वंचित घटकांना व्यावसायिक पद्धतीने गुणात्मक आणि सक्षम कायदेशीर सेवा मिळावी या पवीत्र हेतुने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी बचाव पक्ष विधिज्ञांची भरती घेण्याचे ठरवले होते. परंतु जिल्हा न्यायालय नांदेड येथील समीतीने म. रा. वि. से. प्रा. मुंबई यांच्या या पवित्र उद्देशाला केराची टोपली दाखवत, आरती राधाकिशन बहेती, हिच्यासोबत संगणमत करून, गैरमार्गाचा वापर करून ती पात्र नसतांना, व तिला बचाव पक्ष विधिज्ञ म्हणुन काम करण्याचे जास्त अनुभव नसतांना तिची निवड करून होतकरू व गुनवत्ता असलेल्या उमेदवारांवर अन्याय केला.
सदर बोगस भरतीची तक्रार
मा. मुख्य न्यायधिश साहेब उच्च न्यायालय, मुंबई यांना या लोकांवर गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी किंवा मला या लोकांवर गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्याची परवानगी देण्यात यावी, म्हणुन विनंती अर्ज केलेले आहे, जर त्यांनी त्यांच्यावर काहीच कार्यवाही केल नाही तर 156(3) फौ. प्र.सं. अन्वये या लोकांवरगुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यासाठी ॲड.मो.सलीम हे न्यायलयात दाद मागणार आहे.
व तसेच सदरील बोगस भरती रद्द करून नवी भरती घेण्याकरिता वेळोवेळी म. रा. वि. से. प्रा. मुंबई यांना अर्ज देऊन विनंती केलेली आहे, परंतु त्यांनी आजपर्यंत त्यांच्या अर्जांची दखल घेऊन कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुळे भरती रद्द होऊन नवी भरती होण्याकरिता उच्च न्यायालय, मुंबई येथे दिनांक 13/08/2023 रोजी पासून ॲड.मो.सलीम हे
आमरण उपोषणास बसणार आहे.