अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीतील दुर्दैवी घटना पतीसह पत्नीने विषारी औषध फिल्याने पत्नीचा मृत्यू तर पतीची मृत्यूशी झुंज –

नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क –

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेलगाव रोडच्या बाजूस असलेल्या शेतामध्ये पती आणि पत्नीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु या दुर्दैवी घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती मृत्यूची झुंज देत असल्याची जोरदार चर्चा चालू असून या सदरील घटनेची माहिती कळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती मिळते आहे

जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात पती आणि पत्नीने एकाच वेळी विषारी औषध पिल्याने सदरच्या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेतील पती बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती असून या पती आणि पत्नीने एकत्रितपणे विषारी औषध कशासाठी प्राशन केले हे पोलीस तपास करीत असल्याची माहिती मिळत आहे

अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोनि गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंकुश नागटिळक यांच्यासह संजय घोरपडे कल्याण पांडे मोरकर घटनास्थळी रवाना झाले व घटनेच्या ठिकाणी सदरील मयत महिला सौ. ललीता कैलास डोंगरे वय ३५ वर्षे आणि तिचा पती कैलास डोंगरे वय ३८ वर्षे राहणार वसरणी नांदेड येथील रहिवाशी असून दोघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल आहे

तालुक्यातील शेलगाव रोडच्या बाजुला दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळच्या दरम्यान शेतात एक पुरुष तर दुसरी महिला असे दिसून अल्याने येथील काही सूज्ञान नागरिकांनी बघितले व सदरील दुर्दैवी घटनेची माहिती अर्धापूर पोलीस स्टेशनला दिल्या वरून कसल्याच प्रकारचा विलंब न करता पोलीस घटनास्थळी रवाना होऊन घटनेची पाहणी केली आहे

Google Ad