प्रवीणशेठ घासे यांच्या मदतीच्या हाताने किकबॉक्सिंग मध्ये हर्षे जोशीला मिळाले सुवर्ण पदक.

झारखंड, रांची येथे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून पेणच्या हर्षे जोशी याची निवड

उरण दि 6(विठ्ठल ममताबादे )समाजात सातत्याने कार्य करीत असताना कशाचीही तमा न बाळगता एखाद्या गरजूला मदत करून एखाद्याच्या आयुष्यात एक यशाच मार्ग निर्माण करावं आणि ती मदत आपल्या आयुष्याला सार्थकी ठरेल या उद्धेशाने प्रवीणशेठ घासे हे सातत्याने मदतीचा हात पुढे करत असतात. याचाच प्रत्यय आला आहे पेण तालुक्यातील दादर गावातील हर्षे जोशी यांच्या रूपाने.हर्ष जोशी याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्याला बॉक्सिंग मध्ये आवड असल्याने त्याला स्पर्धेत जाण्यासाठी आर्थिक अडचण येत होती. गावातील काही मंडळींनी स्मार्टसिटी डेव्हलपर्सचे सीएमडी प्रवीणशेठ घासे यांची भेट घेऊन हर्ष जोशी याला आर्थिक मदत मिळावी म्हणून शब्द टाकला. आणि नेहमी उद्दात भावना बाळगून असलेल्या प्रवीणशेठ घासे यांनी हर्ष जोशीला आर्थिक पाठबळ दिलं. आणि राजाराम भिकू पठारे स्टेडियम खर्डी, पुणे येथे झालेल्या “राज्यस्तरीय किकबॉक्सिंग” स्पर्धेत रींग इव्हेंट मध्ये हर्षला “सुवर्ण पदक” मिळालं. या विजेते पदाने हर्ष जोशी याची आता महाराष्ट्रातून झारखंड, रांची येथे राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे.त्यामुळे या यशस्वी कामगिरी बद्दल हर्ष जोशी याचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

कोट (चौकट ):-

खरंतर मला बॉक्सिंग मध्ये आवड आहे आणि मला पुणे येथे स्पर्धेत जायला आर्थिक बजेट नव्हता पण मला ऐनवेळी प्रवीण दादा घासे यानीं माझा खर्च उचलला आणि मला एक नवी ऊर्जा मिळाली आणि त्याच नव्या उरजेच्या आधारावर मी विजय संपादन केलं आणि मला आता झारखंड येथे खेळण्याची संधी मिळाली आहे.
हर्ष जोशी – किकबॉक्सिंग विजेता

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *