भोकर पोलिसांच्या चौकशी मोहिमेला यश एक अट्टल घरफोड्या लागला पोलिसांच्या हाती

भोकर (प्रतिनिधी)

पोलीस उपमहानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील जुन्या आरोपींची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी मोहीम राबविण्यात आली असता चौकशी दरम्यान पोलिसांना यश आले असून यात एक अट्टल घरफोड्या पोलिसांच्या हाती लागला आहे दरम्यानच्या काळात जबरी चोरी, चोरी, घरफोडी, दरोडा, यासारख्या गुन्ह्यात वाढ झाल्याने यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातील अटक आरोपी जामिनावर असलेले अनेक वर्षांपूर्वी ज्यांची अशा गुन्ह्यात नोंद झालेली आहे अशा आरोपींची चौकशी करून ते सध्या काय करतात कोठे राहतात याचे मित्र कोण नातेवाईक कोण आहे याबाबत माहिती घेण्यासाठी व त्यांच्यावर वचक रहावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक व नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील आरोपींची चौकशी मोहीम राबविण्यात येत आहे याच अनुषंगाने भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफखत आमना पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी सहा ऑगस्ट रोजी चौकशी मोहीम राबविली पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक राम कराड, महिला पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी हनवते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी देवकांबळे, जमादार सोनाजी कानगुले, जमादार नामदेव जाधव, जमादार भीमराव जाधव ,जमादार रवी मुधोळे, प्रमोद जोंधळे, नामदेव शिरोळे ,यांनी तालुक्यातील अशा आरोपींना दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी परिश्रम घेऊन भोकर पोलीस ठाण्यात आले व त्यांची कसून चौकशी केली असता या चौकशी दरम्यान गु र नं ३६३/२३ कलम ४५८, ३८०भा.द.वी आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा गुन्ह्यातील एक कट्टर घरफोडया पोलिसांच्या हाती लागला असून त्याचे आरोपीचे नाव व्यंकट गोविंद निलेवाड राहणार भोकर असून सदरील आरोपीने काही दिवसापूर्वी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वातानुकूलित यंत्राची चोरी केली होती तर त्या आरोपीस पकडून आणण्यासाठी जमादार सोनाजी कानगुले व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जोंधळे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे सदरील आरोपीस भोकर पोलीस आणि ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *