धुळे आदिवासी टोकरे कोळी हत्याकांड-प्रा. मोतीलाल सोनवणे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार,ठाकूर अशा ४७ जमातींना अनुसूचित जमातीत, आदिवासी मध्ये समावेश केला आहे. या आदिवासींना आदिवासी म्हणून ३६ व ३६ इनाम जमिनी बहाल करण्यात आले. सातबाराव रच त्यांची आदिवासी नोंद आहे. जंगल, जमीन, वन, नद्या यांचे मूळ मालक, असताना, संविधानाचा अपमान करून या आदिवासींना जातीचा दाखला व वैधता दाखल्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. म्हणून आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. मोल मजुरी करून, हात मजुरी करून, सालधारकी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे*.
*मुलं शिक्षणापासून,नोकरीपासून वंचित झाले आहेत. आदिवासींना न्याय मिळावा म्हणून शानाभाऊ सोनवणे, प्रा.मोतीलाल सोनवणे, भास्कर कुवर सर,नितीन आखडमल, नरेंद्र निकम सर, हेमंत सूर्यवंश प्रकाश पवार सर, मनोहर वाघ, साहेबराव वाकडे, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १० ऑगस्ट २००९ रोजी धुळे कलेक्टर कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या आदिवासी टोकरे कोळी जमातीला जातीचे प्रमाणपत्र मिळेल या आशेने आदिवासी उपाशी पोटी मोर्चात हजर होते. मा. जिल्हाधिकारी गोकुळ मवारे पुण्याला गेले होते. त्यांच्या ऐवजी निवासी उपजिल्हाधिकारी मा.प्रकाश वाघमोडे यांना निवेदन स्वीकारण्यात सांगितले गेले. तेव्हा त्यांनी निवेदनाचे वाचन केले नाही समस्या जाणून घेतल्या नाही. उलट आदिवासींना अपमानास्पद वागणूक दिली. राष्ट्रगीताने सभा विसर्जित झाली. त्यावेळी पूर्णपणे शांतता होती. मुद्दाम गोंधळ उडवून दिला. धुळे कलेक्टर कार्यालय जवळ जिजामाता व कमलाबाई या दोन शाळा आहेत. नि:शस्त्र, निरपराध आदिवासी टोकरे कोळींना पूर्व सूचना न देता अमानुष गोळीबार केला गेला. या गोळीबारात शहादा तालुक्यातील वडाळी येथील भटू कुवर या टोकरे कोळीची हत्या करण्यात आली. त्यापैकी एकाचा तर पोटाचा कोथळाच बाहेर आला. असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारा नंतर लगेच संचार बंदी पुकारल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत. अनंत तरे, शानाभाऊ सोनवणे,भास्कर कुवर सर, नितीन आखडमल, मनोहर वाघ, अशा१४२ निरपराध आदिवासी टोकरे कोळी यांना अटक करण्यात आली. या हत्याकांडामुळे आदिवासी जास्त पेटून उठला. शहीद भटू कुवर यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून प्रत्येक गावात/ पाड्यात, घराघरात, हजारो क्रांतिकारक निर्माण झाले. म्हणून प्रत्येक वर्षी वडाळी येथे १० ऑगस्ट रोजी शहीद भटु कुवर यांच्या हुतात्मा दिवस साजरा करण्यात येतो.*