पागोटे ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण व छत्री वाटप.

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतने पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले असून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे तसेच पर्यावरण विषयक जनतेत जनजागृती व्हावी या दृष्टीकोणातून पागोटे ग्रामपंचायत तर्फे ग्रामपंचायत परिसरात विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच पावसापासून जनतेचे संरक्षण व्हावे या अनुषंगाने पागोटे गावातील सर्व ग्रामस्थांना छत्रीचे वाटप करण्यात आले. पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सुजित तांडेल, ग्रामपंचायत सदस्य-मयूर पाटील,सतिश पाटील, अधिराज पाटील, सदस्या- प्राजक्ता पाटील, करीष्मा पाटील, सुनीता पाटील, सोनाली भोईर, समृद्धी तांडेल,ग्रामसेविका अनिता म्हात्रे आदी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली आहे. या सर्व मान्यवरांनी प्रत्यक्ष उपक्रमात सहभाग घेतला व जनतेलाही या उपक्रमात सहभागी करून घेतला.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *