आम्ही खरोशीकर आणि कराडे बुद्रुक या दोन गावांच्या नवीन नामफलकांचा ( बोधचिन्ह ) अनावरण कार्यक्रम सोहळा झाला उत्साहात संपन्न !…
उरण भोकर भोकर.नादेंड.मुदखेड.बारड.किनवट.उमरी.धर्माबाद रायगड
उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )आज काल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावच्या – गावं उध्वस्त केली जात आहेत.आणि हे सर्व पाहता माझा गाव माझा अभिमान ! ही संकल्पना उराशी बाळगत आज पर्यंत उरण,पनवेल, पेण तालुक्यातील अनेक गावांना त्यांच्या गावांच्या नावांचे ( बोधचिन्ह )अर्थात विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नवीन नामफलक बनवून देण्याचं औदार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्परुपी औदार्यातून पेण तालुक्यातील खरोशी गावात आम्ही खरोशीकर आणि रसायनी येथील कराडे बुद्रुक या गावात आय लव्ह कराडे बुद्रुक या दोन गावांना त्यांच्या गावांच्या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणारे नूतन नामफलक ( बोधचिन्ह ) बनऊन देण्यात आले व त्या नूतन नामफलकांचा अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन खरोशी आणि कराडे बुद्रुक या गावांत करण्यात आले. आज पर्यंत राजू मुंबईकर यांनी अनेक सामाजिक कार्यांच्या माध्यमातून समाजात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटविला आहे आणि ह्याच सामाजिक संस्कारांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या औदार्यातून हे सुंदर कार्य साकारलं गेले.खरोशी गावचे महेशदादा घरत आणि कराडे बुद्रुक गावचे विकासदादा रायकर या युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला मान देतं या दोन गावांचे विद्युत रोषणाईने चमकणारे नामफलक ( बोधचिन्ह )बनवून देण्याचं प्रेरणादायी कार्य साकारण्यात आले.सोबतच खरोशी गावात नामफलक अनावरण सोहळा कार्यक्रमा दरम्यान राजू मुंबईकर प्रथमतः खरोशी केंद्रशाळा येथील शाळेतील ७७ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत त्या शाळेतील आणि अंगणवाडीतील ३०० शालेय विद्यार्थ्यांना रिअल फ्रेश फ्रूटच्या नारळ पाण्याच्या बॉटल्सचं वाटप करण्यात आले तर त्याच बरोबर खरोशी ग्राम पंचायत सदस्य मानसी महेश घरत यांच्या माध्यमातून खरोशी केंद्र शाळेतील प्राथमिक शाळेतील,अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,वह्यांचे वाटप देखील आले.
भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे खरोशी गावचे सुपुत्र भारतीय आर्मी जवान महेंद्रजी पाटील, उरण तालुका सचिव आगरी, कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था अनिल घरत, वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील,कॉन वेश्वी शाखा अध्यक्ष सुरेन्द्र पाटील, खरोशी गावच्या सरपंच रुपाली ताई पाटील,उपसरपंच नितेश घरत, ग्राम पं.सदस्य मानसी घरत,प्रणाली घरत,बेबी भोडकर,लक्षी घरत,नितेश पाटील,धनंजय घरत, गावपंच,ग्रामस्थ अनंता ठाकूर,सीताराम घरत पंढरीनाथ घरत खरोशी येथील कार्यक्रमाचे आयोजक खरोशी गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते महेश दादा घरत,अनंत घरत,मच्छिंद्र घरत,लक्ष्मीकांत घरत, स्वप्निल घरत वैभव घरत,सूरज घरत,राजू घरत,प्रसाद घरत,विकी घरत, रसायनी कराडे बुद्रुक येथील कार्यक्रमाचे आयोजक कराडे बुद्रुक गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते विकासदादा रायकर, कराडे बुद्रुक या गावांतील ग्रामस्थ मंडळी , खरोशी गावांतील ग्रामस्थ मंडळी सोबतच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत ह्या विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नवीन नामफलकांचा अनावरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.