पालक शिक्षक असोसिएशन जेएनपी विद्यालयाच्या उपाध्यक्ष पदी विकास कडू यांची बिनविरोध निवड
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )
21/8/2023 सोमवार रोजी आरकेएफ जेएनपी विद्यालय सेकंडरी इंग्रजी माध्यमची पालक, शिक्षक असोसिएशन (P.T.A.)कमीटी निवडणूक होती.
सेकंडरी इंग्रजी माध्यमचे 1250 पालकांचे नेतृत्व करण्यासाठी दर वर्षी प्रत्येक वर्गात पीटीए मेंबर निवडतात.म्हणजे 25 वर्गात 25 पीटिए मेंबर्स निवडले गेले होते. त्या मधून पालकांचे नेतृत्व करण्यासाठी उपाध्यक्ष निवडले जाते.आणी पालक शिक्षक असोसिएशन 2023/2024 साठी कमेटी स्थापन करतात. त्या कमेटी मध्ये अध्यक्ष दर वर्षी प्रमाणे जे कोण प्रीन्सिपल असतो तो अध्यक्ष पदावर विराजमान होतो. तर 1250 पालकांचा नेतृत्व करण्यासाठी पालकांना मधून निवडणून करून उपाध्यक्ष निवडला जातो
या वर्षी आरकेएफ जेएनपी विद्यालय मधून पालक बंधु भगिनी यांनी उरण तालुक्यातील समाज सेवक विकास कडू यांची निवड केली आहे.ही निवडणूक बिनविरोध झाली. या वर्षी निवडलेल्या उपाध्यक्षचा काळ हा 2023/2024 पर्यंत कालावधीसाठी आहे.उपाध्यक्ष पदी निवडून आलेले विकास कडू हे उरण तालुक्यातील समाज सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगड चे संस्थापक अध्यक्ष आहेत.विकास कडू हे सामाजिक क्षेत्रात 8 वर्ष कार्यरत आहेत.ह्या समाज सेवे बद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे.उपाध्यक्ष पदावर विकास कडू यांची निवड झाल्याबद्दल विकास कडू म्हणले की “सर्व प्रथम मी सर्व पीटीए मेंबर्स आणी 1250 पालकांचे ऋणी राहील की त्यांनी मला ह्या पदासाठी विनविरोध निवडून दिले.मी आरकेएफ जेएनपी विद्यालयात पालकांचे जे काय प्रश्न असतील ते प्रामाणिक पणे सोडवण्याचे प्रयत्न करिन असे वचन देतो. मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे हित कसे होईल यावर काम करण्याचा प्रयत्न करेन “.विकास कडू हे शाळेच्या विकासासाठी अनेक वर्ष लढत होते. त्यामुळे त्यांची निवड झाल्याने सर्व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या नियुक्ती बद्दल त्यांच्या वर सर्वच स्तरातून अभिनंदचा वर्षाव होत आहे.तसेच उरण तालुक्यातील काही समाज सेवक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटून प्रत्यक्ष, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष रित्या शुभेच्छा दिल्या आहेत.