जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचा निषेधासाठी गुरुवार दि.7 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या सांगली जिल्हा बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा…
सांगली
दि. 6 सप्टेंबर 2023
वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने जालना येथे मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने मराठा आरक्षणसाठी चालू असलेल्या आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली असून त्या बंदला सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांची मीटिंग बोलवून पाठिंबाचा ठराव मंजूर करून जाहीर पाठिंबा देत आहोत अशी माहिती जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली ते पुढे म्हणाले, 5 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धाय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जालना येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासाठी पाठिंबा असल्याचे सांगितले असून झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून आम्हीही जिल्ह्याच्या वतीने आरक्षणाला पाठिंबा देत या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आहोत. गुरुवार दि.7 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या सांगली जिल्हा बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा देत आहे.