राजे उमाजी नाईक हे देश स्वातंत्र्यासाठी १८ व्या शतकातइंग्रजांशी लढणारे आद्यक्रांतीवीर- गुणवंत मिसलवाड


नांदेड- भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. काहींची इतिहास नोंद झाली तर काही क्रांतीवीरांची दखलच घेतली गेली नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य विचारावर प्रभावित होऊन १८ व्या शतकात ब्रिटीशांशी लढणारे थोर आद्यक्रांतीवीर म्हणजे नरवीर राजे उमाजी नाईक हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ७ सप्टेंबर २०२३ गुरुवार रोजी सकाळी ठिक११.०० वाजता सशस्त्र क्रांतीचे प्रथम जनक, इतिहासातील शूर लढवय्या, आद्य क्रांतीवीर, नरवीर राजे उमाजी
नाईक यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, १८५७ च्या उठावा अगोदर राजे उमाजी नाईक यांनी
सलग १४ वर्षे इंग्रजांना सळो की पळो करुन पळती भुई करुन सोडले होते व एक वर्षे जेल झाली. जेलमधून
सुटल्यावर साथीदारांना घेऊन इंग्रजांचा खजिना लुटून सामान्य जनतेला वाटला. ४१ वर्षाच्या आयुष्यात रयतेची
प्रामाणिक कार्य सेवा करुन भारत देश स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. अशा या महान क्रांतीकारकाचा इतिहास युवा
पिढीने वाचन करून आदर्शयुक्त कार्य समाजाप्रती, देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही
ते यावेळी म्हणाले.
सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा. श्री. आशिष मेश्राम यांच्या हस्ते आद्यक्रांतीवीर, नरवीर राजे उमाजी
नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बसस्थानक प्रमुख
यासीन हमीद खान, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अशोकराव चव्हाण, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन
पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहर माळगे, नागोराव पनसवाड,
वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, उमेश सातोनकर, संतोष देवकांबळे, गुलाम रब्बानी, वाहतूक नियंत्रक
बालाजी पडलवार, राजेंद्रसिंग चावला, माधवराव सुरेवाड, निखील सावरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेवटी नितीन मांजरमकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी
आगारातील कामगार, कर्मचारी बंधु भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad