भोकर मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत दोन दिवशीय क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर


भोकर तालुका प्रतिनिधी
.राज्य पाणी व स्वच्छता मिशन महाराष्ट्र, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद नांदेड व केआरसी टेक्नोस्पर्ट ग्रामविकास प्रतिष्ठान, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जल जीवन मिशन प्रशिक्षणामध्ये नां भोकर तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी यांना बोलावण्यात आले होते07 सप्टेंबर 2023 ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, कला वाणिज्य विज्ञान,,भोकर येथे 05 बॅचेस मध्ये दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण घेण्यात आले. गटविकास अधिकारी डी एस कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले..प्रशिक्षणाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या दोन दिवशीय प्रशिक्षणामध्ये जल जीवन मिशन प्रकल्पाचा उद्देश, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांची भूमिका व जबाबदारी आणि प्रकल्पाची अंमलबजावणी देखभाल व दुरुस्ती प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित व शाश्वत 55 लिटर पाणी देण्याचे अनुषंगाने शासन ,स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मुख्य भूमिका इत्यादी विषयांचे सत्राद्वारे प्रशिक्षण संस्थेचे मास्टर ट्रेनर यांच्याकडून देण्यात आले. जलजीवन मिशन हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी नळाद्वारे नियमित उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे
प्रशिक्षण कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे कार्य अध्यक्ष पत्रकार बी आर पांचाळ , पत्रकार बाबुराव पाटील , विस्ताराधिकारी कांबळे ,, ग्रामसेवक व सरपंच यांनी प्रशिक्षणास सहकार्य केले तसेच, बी आर पांचाळ यांनी प्रशिक्षणात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधला, प्रशिक्षण घेऊन प्रत्येक गावागावात जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी कशी होते याबाबत सर्वांनी लक्ष घालावे असे मत मांडले जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष नांदेड चे एचआरडी मानवतकर बीआरसी यांनी वेळोवेळी कार्यक्रमास भेटी देऊन कार्यक्रमाची व्यवस्थापन व गुणवत्ता तपासली आणि प्रशिक्षणार्थींना महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
वरील प्रशिक्षण वेगवेगळ्या बॅच द्वारे विविध सत्रांमध्ये पीपीटी च्या माध्यमातून व खेळांच्या माध्यमातून आणि संबंधित उदाहरणांच्या माध्यमातून केआरसी संस्थेचे प्रवीण प्रशिक्षक यांच्याद्वारे देण्यात आले.

Google Ad