भोकर येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात शिव महापुराण कथेचे आयोजन


प.पू.स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज कथा प्रवक्ते( फोटो


भोकर तालुका प्रतिनिधी सार्वजनिक गणेश मंडळ भोकर यांच्या वतीने चालू वर्षीच्या गणेशोत्सवात दि.21 ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून शिव महापुराण कथा प्रवक्ते बालयोगी परमपूज्य गजेंद्र चैतन्यजी महाराज हे राहणार असून सात दिवस रात्रीला कीर्तनाचे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आलेले आहेत.
भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीच गणेश उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते सात दिवस सप्ताह मध्ये श्रीमद भागवत कथा केली जाते चालू वर्षाच्या गणेशोत्सवामध्ये शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून बालयोगी परमपूज्य गजेंद्र चैतन्यजी स्वामी महाराज त्यांच्या ओजस्वी रसाळ व नेतून कथा ऐकावयास मिळणार आहे दररोज दुपारी2 ते 5 या वेळेमध्ये कथा होणार असून भोकर येथील माऊली धाम मोंढा मैदान येथे भव्य मंडपात कथेचे आयोजन करण्यात आले आहे रात्री आठ ते दहा या वेळात कीर्तनाचे कार्यक्रमा होणार आहेत 21 सप्टेंबर 2023 रोजी ह.भ. प.ओमसती ताई कनोजवार वीरसनीकर, 22 सप्टेंबर रोजी ह.भ. प.योगेश महाराज अग्रवाल वसमतकर,23 सप्टेंबर रोजी ह .भ.प.आशिष महाराज काटे शिखर शिंगणापूर,24 सप्टेंबर 2023 रोजी ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे आळंदी,25 सप्टेंबर रोजी ह.भ. प.ज्योतीताई धनाडे ब्रम्हनाथ नगरकर,26 सप्टेंबर 2023 रोजी ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर,27 सप्टेंबर 2023 रोजी ह.भ.प.अविनाश दादा भारती घाटनांदुरकर यांचे कीर्तन होणार असून 28 सप्टेंबर रोजी सांगता होणार आहे सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये ह.भ.प.परमपूज्य बालयोगी गजेंद्र चैतन्य स्वामी यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळ भोकर यांनी केले आहे

Google Ad