भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाची माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी केली आरती


भोकर (तालुका प्रतिनिधी)येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेमध्ये 24 सप्टेंबर 2023 रोजी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
सार्वजनिक गणेश मंडळ भोकर यांच्या वतीने 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून कथा प्रवक्ते बालयोगी परमपूज्य स्वामी गजेंद्र चैतन्य जीमहाराज यांच्या रसाळ वाणीतून कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी लाभली आहे 24 सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शिव महापुराण कथा प्रसंगी भेट देऊन गणेश मूर्तीचे दर्शन घेतले ग्रंथाचे पूजन केले स्वामी गजेंद्र चैतन्य स्वामी यांचेही दर्शन घेऊन प्रसाद घेतला भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीच अध्यात्मिक कार्यक्रम राबविले जातात भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते या ठिकाणी शिवपुराणकथा चालू असून भाविक भक्त मोठे तलीन होऊन कथेमध्ये दिसत आहेत ही आनंदाचि बाब आहे गणेश उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रम घेणे अत्यंत महत्त्वाचे असून या ठिकाणी लोकांना मोठा आनंद मिळतो आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण,गोविंदराव पा.शिंदे नागेलीकर,मंगाराणीताई अंबुलगेकर,बाळासाहेब पाटील रावणगावकर,सभापती जगदीश पाटील भोशीकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव दंडवे, तिरुपती कोंडेकर,उपसभापती बालाजी शांणमवाड,विनोद पा.चिंचाळकर,संचालक रामचंद्र मुसळे,इंजि.विश्वंभर ऍड. शिवाजी कदम अतरिक् पा.मुंगल सारंग मुंदडा आदींचा सत्कार करण्यात आला प्रस्ताविक गणेश मंडळाचे सचिव दिलीप सोनटक्के यांनी केले सूत्रसंचालन आभार उपाध्यक्ष बी.आर.पांचाळ यांनी मानले या कार्यक्रमास अध्यक्ष रामदेव दोडीया, सुरेश चिंतावार,देवानंद धूत ,रावसाब पाटील,डॉ.किरण पांचाळ,राजू देशपांडे,महेश नारलावार, गणराज सादुलवार, साईदास माळवदकर,आनंद बोले,विठ्ठल माचनवाड यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते शिव महापुरान कथेत शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला

उरण भोकर भोकर.नादेंड.मुदखेड.बारड.किनवट.उमरी.धर्माबाद रायगड

Google Ad