प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती भोकर शहरात उत्साहात साजरी

भोकर( लतीफ शेख)इस्लामी कालगणनेतील ‘रबीऊल अव्वल’ महिन्याच्या १२ तारखेला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते यावर्षी ईद-ए-मिलाद व गणेश विसर्जनाची मिरवणूक एकाच दिवशी आल्याने ईद-ए-मिलाद एक ऑक्टोबर रोजी साजरा करण्याचे मिलाद कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आले दिनांक एक आॅक्टोंबर रोजी शहरातील सईद नगर येथील मस्जिदे आयेशा येथून चारचाकी वाहनावर इस्लामी ध्वज तसेच फुलांचे हार, फुगे लावून सजविण्यात आले होते. त्यावर ‘मदिना शरीफ’च्या प्रतिकृती उभारून जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक काढण्यात आली.पारंपरिक पद्धतीने फातिहा पठण करत जुलूसला सुरुवात झाली मिरवणुकीत हाजी ईद्रीस सेठ, हाजी इमरान सेठ,शेख युसुफ,हमिदखाॅन पठान,मकसूद गोंदवाले,मिर्झा ताहेर बेग,रियाजोद्दीन सर,जवाजोद्दीन बडबडेकर,बाबाखाॅन पठान,म.ताजोद्दीन,आमिर मिस्तरी ,जुनेद पटेल,सौद गोंदवाले ,अयूब भाई,शेख करीम करखेलीकर,आतीफ भाई दातारवाले,अर्शद अहेमद,रफिक भाई मेडीकलवाले,शेख अश्शू,सह आदि सामील झाले होते जुलूस मार्गावर रस्ते बॅरेकेडिंग करून बंद करण्यात आले होते. तसेच संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी चौख पोलीस बंदोबस्त होता. सदरील मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात येतात जमीयते उलैमा ए हिंद चे जिल्हा उपाध्यक्ष मौलाना मुबीन खाॅन इनामदार यांनी मिलाद कमेटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शाल पुष्पहार टाकून स्वागत केले मिरवणूक पुणे नियोजित ठिकाणी मार्गस्थ झाली वस्ताद लहुजी साळवे चौक येथे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे सपोनि रसूल तांबोळी यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व गृह रक्षक दलाच्या जवानांसह पत्रकारांचे मिलाद कमिटीच्या वतीने पोलीस शाल पुष्पहार टाकून सत्कार करण्यात आले
इदगाह येथे सामुदायिक प्रार्थना करून करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सदरील मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मिलाद कमिटीचे अध्यक्ष हमीद खाॅन पठाण, शेख नाजीम,पत्रकार शमीमोद्दीन इनामदार,बाबूभाई तामसेकर,यूसूफ सेठ, उपाध्यक्ष मन्सूर पठाण कोळगावकर, एजाज भाई लाईनमेन,आवेस तामसेकर, सलमान तामसेकर आसिफ तामसेकर आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले जुलूस दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

Google Ad