दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जयंती निमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली.

उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )
दिवगंत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जयंती निमित्त पनवेल मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आम्ही मराठी या पोवाडाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. पोवाडा कार्यक्रमातून शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज ते लोकनेते दि. बा. पाटील व नंतर कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या विचार व कार्याची माहीती आपल्या पोवाडातून सर्वांना दिली.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाम म्हात्रे साहेबांचे विचार व कार्य या बद्दल आपले मनोगत व्यक्त करून शब्द रूपाने त्यांना आदरांजली वाहिली.शेवटी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या जीवनातील विविध आठवणी सर्वांना सांगितले. शाम म्हात्रे साहेब हे एक विचार आहे. हा विचार सर्वांनी पुढे नेण्याची गरज आहे असे मत व्यक्त करत सर्वात शेवटी श्रुती म्हात्रे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन अतिष पाटील यांनी केले.यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, नगरसेवक गणेश पाटील, सुनील मोहोळ, जे. डी. तांडेल, वैजनाथ ठाकूर, शंभु म्हात्रे, पल्लवी रेनके, सुदाम पाटील, माया अहिरे, गणेश कडू, नाना म्हात्रे, कृष्णा पारंगे, किशोर ठाकूर, मारुती शेरकर, एकनाथ ठोंबरे, पंकज भगत, अजित म्हात्रे आदी मान्यवर तसेच शेतकरी, कामगार, प्रकल्पग्रस्त, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते म्हणून शाम म्हात्रे यांची ओळख आहे. दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम पदाजी म्हात्रे यांच्या जयंती निमित्त एकता कँटलिस्ट, कोकण श्रमिक संघ, व्यावसायिक विक्रेता संघ आणि आगरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि 7 ऑक्टोंबर 2023 रोजी आदय क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल येथे सकाळी 11 वा.रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांचा मराठमोळा पोवाडा व स्फूर्ती गीतांचा प्रबोधनपर शाहिरी कार्यक्रम “आम्ही मराठी” हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला .ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी शाम पदाजी म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कामगार, विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी,शाम म्हात्रे साहेबांचे चाहत्यांनी व नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून शाम म्हात्रे यांना आदरांजली वाहिली.

Google Ad