महाराष्ट्रातील रुग्णालये मृत्यूचा सापळा होत आहेत. सरकारने शासकीय रुग्णालये अद्यावत करावेत अँड निलेश करमुडी संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती

महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सोई -सुविधाआणि त्रुटीची पूर्तता केली गेली तर भविष्यात नांदेड- ठाणे- नाशिक सारख्या रुग्ण मृत्यूच्या घटना समोर येणार नाहीत. गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या शासकीय आरोग्य सेवा अद्यावत आणि सुदृढ करणे सरकारच्या हाती आहे. रुग्णांच्या मृत्यूचे खापर यंत्रणा अथवा डॉक्टरांवर फोडून सरकार मोकळे होणार असेल तर रुग्ण मृत्यू सारख्या घटना वारंवार होत राहतील.
शासकीय रुग्णालयातील परिस्थिती पाहता रुग्णांची सरकार वरील विश्वासहर्ता संपत चालली आहे. रुग्णांणा व रुग्ण नातेवाईकांना हिन वागणूक दिली जाते तासंतास प्रतीक्षा, बंद व नादुरुस्त उपकरणे, आणि ती चालू असतील तर ऑपरेटर नसणे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एम आर आयच्या अद्यावत मशीनरी नाहीत तसेच रक्त तपासणी विविध टेस्ट,करिता पॅथॉलॉजी लॅब आहेत परंतु सर्वच टेस्ट होत नाहीत म्हणून रुग्णांना या सुविधा बाहेरूनच जास्तीचे पैसे देऊन घ्यावी लागतात.अस्वच्छ स्वछतागृहे
औषधी असूनही दिली जात नाहीत,रुग्णांच्या या सर्व समस्या नियमित आहेत.या समस्या अजूनही संपल्या नाहीत हे सरकारचे अपयश आहे.सरकारी रुग्णालये हे मृत्यूचे सापळे होत आहेत हि बाब निंदनीय आहे. नांदेड सारख्या रुग्णमृत्यूच्या घटना भविष्यात होऊ द्याचे नसतील तर सरकारने शासकीय रुग्णालये अद्यावत करावेत.सरकार असे करत नसेल तर नागरिकांनी जागृत होऊन आरोग्य सुविधा बाबत आंदोलन केले पाहिजे, आरोग्याचा हक्क हा आपला मूलभूत हक्क आहे, आरोग्य व रुग्णांच्या हक्कासाठी रुग्ण हक्क संरक्षण समिती कायम लढत आहे. परंतु नागरिकांनी पण जागृत होऊन आरोग्य क्रांती करावी असे आवाहन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हणमंत गोत्राळ, महिला प्रदेश अध्यक्ष रेणुका बोरा, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण, प्रदेश संघटक नरेंद्र बोरा, प्रदेश संपर्क प्रमुख डॉ विनोद इघवे, मराठवाडा अध्यक्ष पूजा निचळे,, पुणे विभाग प्रमुख संजय जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख धनाजी जोशी, विदर्भ प्रमुख रविंद्र मेश्राम, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अशोक पालक, विदर्भ कार्याध्यक्ष सूरज यादव, मराठवाडा संघटक, रामेश्वर गंगावणे, मराठवाडा कार्याध्यक्ष विजय मोरे,प्रा शंकरराव सोनावणे,लातूर जिल्हाद्यक्ष दीपक गंगणे,परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर,सोलापूर जिल्हाध्यक्ष सुमित भांडेकर पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष वैशालीताई वाकळे , अकोला जिलाध्यक्ष संगीता भंडारे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे,जिल्हाध्यक्ष सुनील डोईजड,आदी सर्व पदाधिकारीच्या
वतीने करण्यात येते

Google Ad