जागतिक स्पर्धेत उतरावयाचे असेल तर बारा बलुतेदारांना आपले कौशल्य सिद्ध करावे लागेल- उपायुक्त शिवानंद मीनगिरे
भोकर (तालुका प्रतिनिधी)पारंपारिक पद्धतीने बारा बलुतेदारापैकी आपला व्यवसाय करणारा सुतार समाज होता भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ जुळलेली होती शेतकऱ्याप्रती त्यांची आस्था होती पण बदलत्या युगात आता थोडेफार महत्त्व कमी होत असेल तरी बारा बोलतेदारांनी खचून न जाता आपले कौशल्य नव्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने सिद्ध करावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे उपायुक्त शिवानंद मीनगिरे यांनी भोकर येथे बोलताना केले.
भोकर येथे विश्वकर्मा मंदिर प्रतिष्ठान युवा संघ व महिला संघाच्या वतीने दि 12 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजनेचे अर्ज भरण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अध्यक्षपदी समाज कल्याण उपायुक्त शिवानंद मिनीगिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर.सारंगधर, नागनाथराव देशमुख, प्रांत अध्यक्ष बालाजी खर्डे पाटील, पी.जी.यादव, मंडळ अधिकारी मनोज कंधारे,बाबुराव उमरीकर आदींची उपस्थिती होती प्रारंभी श्री विराट विश्वकर्मा प्रभू पूजन व दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या सत्कारानंतर पुढे बोलताना उपायुक्त शिवानंद मीनगिरे म्हणाले प्रभू विश्वकर्मा हे त्या काळचे इंजिनियर होते द्वारका हस्तीनापुर रावणाची लंका त्यांनी बनवली त्यांचे वंशज असलेल्या सुतार समाजाला कलेची देणगी आहे पूर्वी ग्रामीण भागात अतिशय महत्त्वाचे काम सुतारकरिता असत त्यावर शेतीचा व्यवसाय होता आधुनिक काळामध्ये यंत्राच्या साह्याने सर्व काही तयार होऊ लागले पारंपारिक व्यवसाय बुडीत निघाले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पारंपारिक व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना ही कार्यान्वित केली या योजनेमध्ये बाला 12 बलुतेदारांना स्थान आहे त्यांनी नोंदणी करून प्रशिक्षण घ्यावे व त्यानंतर उद्योगासाठी कर्ज मिळणार आहे कोणतेही काम मनातून केल्यास यश मिळते ध्येय व चिकाटीच्या जोरावर यश गाठता येते सुतार समाजाने संघटित म्हणावे आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी एकत्र यावे असेही ते यावेळी म्हणाले जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी एस.डी सारंगधर,नागनाथराव देशमुख,बालाजी खर्डे पाटील यांनीही योजनेबाबत आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन बी.आर.पांचाळ यांनी केले या कार्यक्रमास महंत परमेश्वर महाराज,दत्तात्रय पांचाळ,सचिन पांचाळ,भगवान पांचाळ,गोविंद पांचाळ,व्यंकट पांचाळ,विठ्ठल पांचाळ,महेश पांचाळ यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अमोल पोलाद्वार यांनी मानले मंदिर समिती युवा संघ महिला संघ यांनी यावेळी परिश्रम घेतले