मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागे न लागता बौद्ध धम्माची दिक्षा घ्यावी. डॉ. राजन माकनिकर
मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागे न लागता बौद्ध धम्माची दिक्षा घ्यावी. डॉ. राजन माकनिकर
मुंबई दि (प्रतिनिधी) मराठा बांधवांनी आरक्षण मिळवण्यासाठी आपले प्राण पणाला न लावता सरळ सरळ बौद्ध धम्म स्वीकारावा. बौद्ध धम्मात हर्षल्हासात स्वागत होईल असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकनिकर यांनी केले आहे.
सम्राट अशोक विजयादशमी दिनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्याच धरती वर मराठा बांधवांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देऊ केलेलं आरक्षण नाकारून जी चूक केली त्याची सुधारणा आताच्या समजदार मराठ्यांनी करावी.
विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकनीकर पुढे म्हणाले की,
बौद्ध धम्मातील तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत. बौद्ध धर्म प्रत्येकाला प्रज्ञा शिकवतो. अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही.
प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे. त्यामुळे मराठा समाजाने बुद्धाला, धम्माला, संघाला व आंबेडकरांना शरण यावे.
धम्म स्विकारल्याने आरक्षण तर मिळेलच शिवाय जातीवाद नष्ट होईला. रोटी बेटी व्यवहार होऊन पूर्वाश्रमातील महार व मराठे एक होतील व बंधुत्व वाढेल, समता नांदेल. मराठा-महार हें मुळातच भाऊ-भाऊ आहेत. त्यांच्यातील एकीचे बळ हें राजकारणात आमुलाग्र बदल घडवतील असेही डॉ. राजन माकनिकर म्हणाले.