महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना ता.शाखा: भोकर जि. नांदेड –तालुकाध्यक्षपदीमाधवराव ढगे (पाटील) व सरचिटणीसपदी बालाजी कनोजवार

भोकर तालुका कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना  तालुकाध्यक्षपदी माधवराव ढगे पाटील तर सरचिटणीसपदी बालाजी कनोजवार यांची निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस राज्य प्रतिनिधी शिवकुमार देशमुख, जिल्हा प्रतिनिधी अनुप श्रीवास्तव,श्री भास्कर कापसे, जगन्नाथ लाकडे प्रभाकर सोगे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी जिल्हा सहसचिव कविता बसवंते, तालुका कार्याध्यक्ष संतोष सितावार, कोषाध्यक्ष भूमण्णा खांडरे, उपाध्यक्ष पदी तुलसीदास वनसागर आणी कमल दासरे, सहसचिव स्मिता बरकुले, संघटक यु व्ही केंद्रे, प्रसिध्दीप्रमुख शिवकांत मंगनाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य संपर्कप्रमुख *गुलाब पाटील वडजे* यांनी केले.व आभार प्रदर्शन जि.उपाध्यक्ष श्री.अरविंद मुणगे यांनी केले.निवडीबद्दल बाळासाहेब पाटील रावणगावकर(मा.सभापती कृषी व पशुसंवर्धन), जगदीश पाटील भोसीकर (सभापती कृ.उ.बा.समिती भोकर ), प्रकाशराव देशमुख (मा.सभापती कृषी व पशुसंवर्धन) गणेश पाटील कापसे (अध्यक्ष BJPभोकर), किशोर पाटील (BJP जि.उपाध्यक्ष BJP,नांदेड ) गट विकास अधिकारी भोकर श्री. केंद्रे सर,विस्तार अधिकारी श्री.कांबळे सर, तसेच पं.स.कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
Google Ad