भोकर येथील शहीद जवान नरसिंग जिल्हेवाड यांच्या कुटुंबीयांचा सन्मान


भोकर( तालुका प्रतिनिधी) भारतीय सीमेवर कर्तव्य बजावित असताना शहीद झालेल्या भोकर येथील जवान नरसिंग जिल्हेवाड यांच्या कुटुंबीयांचा शहीद दिनानिमित्त दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी शहीद स्मारकाच्या ठिकाणी भेटवस्तू उपहार देऊन सन्मान करण्यात आला.
भारतीय तिब्बट सीमा पोलीस बल दलामध्ये सैनिक म्हणून सेवा बजावणारे भोकर येथील जवान नरसिंग शिवाजी जिल्हेवाड हे आपली सेवा बजावित असताना शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ शाहू विद्यालय भोकर येथे स्मारक उभारण्यात आले त्या स्मारकाच्या ठिकाणी 21 ऑक्टोबर 2023 रोजी शहीद दिनानिमित्त 44 बटालियन हलवा कॅम्प बेळगाव कर्नाटक येथील ये. एस. आय. रामुसिंग राठोड, शिपाई संतोष माने हे भोकर येथे येऊन शाहू विद्यालयातील स्मारकाच्या ठिकाणी प्रारंभी नरसिंग जिल्हेवाड यांच्या प्रतिमेस व स्मारकास पुष्पहार अर्पण केले मानवंदना दिली त्यानंतर शहीद जवान जिल्हेवाड यांच्या मातोश्री सखुबाई जिल्हेवाड पत्नी सत्यभामा जिल्हे वाड व मुलगी दोन मुले यांचा शहीद दिनानिमित्त भेट वस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी शाहू विद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार बी.आर. पांचाळ मुख्याध्यापक जगदंबे, पत्रकार अनिल डोईफोडे सहशिक्षक किनेवाड गोडगे सुरक्षारक्षक राठोड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते जिल्हे वाढ यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा सार्थ अभिमान आम्हाला आहे त्यांनी महान कार्य देशासाठी केले आहे त्यांचे स्मरण आपल्या सर्वांना नेहमी व्हावे त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही नेहमी आहोत असे मत उपस्थित ये. एस. आय. रामूशिंग राठोड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले

Google Ad