धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रेला आदिवासी विकास संघाच्या पाठिंबा जाहीर-प्रा.मोतीलाल सोनवणे
धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रेला आदिवासी विकास संघाच्या पाठिंबा जाहीर-प्रा.मोतीलाल सोनवणे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कोळी,ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी,कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासी कोळी जमाती अनुसूचित जमातीमध्ये मोडतात. तरी आदिवासींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र पासून वंचित केले जात आहे. त्यांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावेत. सर्व आदिवासी योजनांच्या लाभ मिळावा. अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीश किंवा आय.ए.एस दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा. खऱ्या आदिवासींना न्याय हक्कापासून वंचित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. धुळे येथील आदिवासी टोकरे कोळी जमातीवर झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करावी. मणिपूर येथील कुकी जमातीचा महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. म्हणून वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा १७ नोव्हेंबर २०२३ पासून ते हा महामोर्चा २९ नोव्हेंबर रोजी पायी मंत्रालयावर जाणार आहे तरी या पदयात्रेला आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे सह सर्व आदिवासी विकास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.