वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात भजन दिंड्या व मिरवणुकीने भक्तिमय वातावरण


भोकर( तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनी फार मोठे सामाजिक परिवर्तन करून वारकरी संप्रदायाची परंपरा टिकवून ठेवली ती आजही कायम आहे वारकरी साहित्य परिषदेचा या कार्यात मोठा सहभाग असून नांदेड जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने 12 व्या वर्धापन दिनानिमित्त 11 नोव्हेंबर 2023 रोजी सिडको नांदेड येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भजन दिंड्या व मिरवणूकिने भक्तिमय वातावरण झाले होते.
वारकरी साहित्य परिषद गे ली 12 वर्षापासून महाराष्ट्रात संत साहित्य व संतांच्या कार्याचा प्रसार प्रचार करते आहे विविध उपक्रम राबवित आहे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनानुसार वारकऱ्यांच्या समस्या शासनाकडे नेहमी मांडण्यात येत असून यशस्वीपणे ग्रामीण भागापर्यंत वारकरी साहित्य परिषद पोहोचली आहे 11 नोव्हेंबर 2023 रोजी श्री दत्तकृपा मंगल कार्यालय सिडको नांदेड येथे वारकरी साहित्य परिषदेचा बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे माजी जिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन करून संत प्रतिमांचे पूजन करण्यात आले मान्यवर मंडळींचा विठ्ठल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला गजानन दिंड्या सह महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन उत्साह पूर्ण वातावरणात मिरवणूक काढली आनंद साजरा केला त्यामुळे भक्तिमय वातावरण तयार झाले होते यावेळी बोलताना व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी वारकरी संप्रदाय हा महान असून संतांनी दिलेली शिकवण त्यांच्यामुळे मिळाल्याने अनेकांचे संसार सुखाचे झाले अनेक गावे सुखी झाले व्यसने दूर झाली युवा पिढी देखील सुधारत असल्याचे मत व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात आमदार मोहन अण्णा हंबर्डे बोलताना म्हणाले वारकरी संप्रदायाच्या कार्यामुळे दूषित विचाराचे प्रदूषण दूर झाले साधू संतांच्या संगतीमुळे आचरण शुद्ध होते जीवनात समाधान मिळते वारकरी साहित्य परिषद चांगले कार्य करीत आहे त्यामुळे आपणास खूप मनस्वी आनंद झाला असेही ते शेवटी बोलताना म्हणाले,प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजेश्वर महाराज बोमनाळीकर यांनी वारकरी साहित्य परिषदेच्या कार्याचा आढावा दिला उपाध्यक्ष बी.आर.पांचाळ यांनी नांदेड जिल्ह्यात वारकरी साहित्य परिषदेचे कार्य गौरवशाली होणार आहे सर्वांनी एक संघपणे गावागावात काम करावे असे विचार मांडले दुसऱ्या सत्रात ह .भ.प.रामेश्वर गौड महाराज यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते वारकरी संप्रदायाची चळवळ व संतांचे विचार याबाबत मान्यवरांनी विचार मांडले या कार्यक्रमास वा.सा.प.चे विश्वस्त ह.भ. प.चौरे महाराज,लक्ष्मी छायाताई भडके, ह.भ. प.अण्णासाहेब जहीरे, ह.भ. प.देविदास.गीते महाराज,ह भ प नरसिंग महाराज केरुरकर ,प्रा. सूर्यकांत पांचाळ रुईकर कोषाध्यक्ष लक्ष्मणराव कदम मोरे महाराज भुजंग महाराज ,महाजन महाराज,सौ खरानेताई इंगोले ताई यांचे सह जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *