के.टी.एल.कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तरुण प्राध्यापकाचा मृत्यू: वरिष्ठांचे दुर्लक्ष
भोकर( तालुका प्रतिनिधी) लोहगाव फाटा, उमरी, भोकर, तामसा, हदगाव या राज्य महामार्गावरील रस्त्याचे काम करणाऱ्या के.टी.एल.कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील प्राध्यापक गौरव मिरकुटे यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याने त्या बेजबाबदार कंत्राट दाराच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.लोहगाव फाटा ते उमरी भोकर तामसा हदगाव या राज्य महामार्गावर के.टी.एल.कन्स्ट्रक्शनने काम सुरू केले आहे गेली तीन वर्षापासून हे काम चालू आहे जागोजागी खड्डे खोदून अर्धवट काम ठेवण्यात येते वाहतुकीसाठी असणाऱ्या रस्त्याचे काम करीत असताना जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती या कंपनीकडून घेतली जात नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत वळण रस्त्यावर धोक्याचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही रस्त्याच्या कडेला कठडा उभा केला नाही धोक्याच्या ठिकाणी रेडियम चा वापर करून सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत लाल झेंडे किंवा लाल लाईट दाखवण्यात आलेला नाही यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मोठी अडचण होत आहे पुढे रस्ता कुठे खोदलेला आहे वळण कुठे आहे रस्ता कुठे आहे हे कळतच नाही रस्त्याचे काम करीत असताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडालेली असते बाजूच्या शेतीच्या पिकावर धूळ साचून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाळ्यात रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती झाली असताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली, कंत्राटदार मात्र ह्या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असून बे जबाबदारपणे वागतात मला कोणी काही म्हणू शकत नाही अशा अविर्भावात ते राहतात
- तरुण प्राध्यापकाचा रस्त्यामुळे अपघात होऊन झाला मृत्यू
भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील प्राध्यापक गौरव मिरकुटे यांचा 22 नोव्हेंबर 2023 रोजी गणेश खांडी घाटात रात्रीच्या वेळी रस्त्याच्या अर्धवट खोदकामामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला उलटून त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामाबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे
गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन
भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामे चालू असल्यामुळे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्या जात आहेत त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे काही कंत्राटदार नाममात्र रॉयल्टी भरून रात्री बेरात्री मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवीत आहेत शासनाच्या तिजोरीत जाणारा पैसा मात्र कंत्राटदारांच्या घशात जात आहे लवकर तालुक्यातील गौण खनिजाचा प्रकार शोध घेतल्यास मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास येते कंत्राटदारांनी केलेल्या अवैध उत्खननाची महसूल विभागाने चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करण्याची गरज आहे