लोहा पोलिसांचे अवैध धंदे करणाऱ्यावर सर्जिकल स्ट्राइक आठ ठिकाणच्या छापी मारीत आठ जण ताब्यात इशारा दिला आणि करून दाखविला दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर
लोहा पोलिसांचे अवैध धंदे करणाऱ्यावर सर्जिकल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार लोहा यांच्या सूचनेनुसार लोहा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात म्हणजे लोहा शहरात ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या आठ छापीमारीमध्ये आठ जणाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर लोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी काल परवाच नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून लोहा शहरात व कार्यक्षेत्रात अवैध धंदे चालू देणार नाही व अवैध धंदा करणाऱ्याची कसल्याच प्रकारची गैय केली जाणार नाही असा संसनीत इशारा दिला होता परंतु शहराच्या चौकासह अनेक ठिकाणी पोलिसांच्या नजरा चुकून गुटका तंबाखू पान मसाला विक्री करणाऱ्या आठ ठिकाणी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी त्यांच्या पोलीस सहकार्यासह छापेमारी केली आहे
लोह पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी मारलेल्या छापेमारी मध्ये हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदरच्या आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोनि चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे
ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी लोहा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून आज पर्यंतच्या कार्यकाळात वेगवेगळ्या स्वरूपाच्या दमदार कारवाह्या करून अनेकांचे धाबे दणावून सोडले तर या पुढे सुद्धा लोहा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोणी अवैध धंदे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कसल्याच प्रकारची गैय केली जाणार नाही असा लोहा पोलिसांचा परत एकदा अवैध करणाऱ्यांना इशारा आहे