भोकर पोलिसांनी केली मोटी मोहीम ; दुचाकी चोरट्यांना अटक करून केले १७ मोटारसायकली जप्त..
भोकर प्रतिनिधी – सध्या मोटरसायकली चोरण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असून. याचा छडा लावण्यासाठी भोकर पोलिस ठाण्याचे कत्वर्यदक्ष निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मोहीम मध्ये भोकर पोलिसांनी कारवाई करत तालुक्यातीलच दोन अट्टल बाईक चोरांना अटक करून. त्यांच्याकडून तब्बल आठ लाख ७० हजार किमतीच्या १७ मोटरसायकल जप्त करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी माहिती दिली आहे.
याबाबत असे की, भोकर व परिसरात घरासमोर व दुकानासमोर उभ्या असलेल्या मोटरसायकली मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्या आहेत. चोरट्याने शिफातीने मोटरसायकली चोरल्याचा घटना घडल्या आहेत. अशातच पोलिसांना भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील विजय सोनकांबळे व नवीन गुद्दैवाड हे दोघे तेलंगणा राज्य व भोकर पोलीस स्थानकाच्या हद्दीतून मोटरसायकल विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी विजय सोनकांबळे या आरोपीस ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपीने दुचाकी चोरून विकल्याची कबुली दिली, तेव्हा भोकर पोलीसांनी गु.र.नं. ४१३ /२०२३ भा.द.वि.३७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन तपासाची चक्रे गतिमान केली असता, या चोरांनी भोकर हद्दीतून दोन तामसा येथील एक आणि तेलंगणातून १४ अशा मोटरसायकल ऐकुन १७ मोटारसायकली चोरून त्या मजूरवाडी तामसा तालुका हादगाव येथील अल्ताफ शेख यांना विक्री केल्याचे कबूल केले. त्यानुसार नोकर पोलिसांनी आठ लाख ७० हजार रुपयांच्या किंमतीच्या एकूण सतरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत. यातील दुसरा आरोपी नवीन गुद्दैवाड हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सदर आरोपीस अटक झाले असते तर आणखी चोरी गेलेल्या गाड्या सापडण्याची शक्यता असल्याचे पोलिसाचे म्हणणे आहे. दरम्यान यातील दोन आरोपीस दि. १३ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता आरोपीना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरील चोरीची कामगिरी यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर पाटील उपनिरीक्षक विकास आडे पोलीस अमलदार दिलीप जाधव नामदेव जाधव गुरुदास आरेवार परमेश्वर करणे मोहीम सय्यद यांनी मोहीम फत्ते केले आहे