रायखोड पाणी पुरवठा कार्यालयाकडून होत असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे-ऊप सरपंच दामनवाड यांचे निवेदन

भोकर (अनिल डोईफोडे) येथील मौजे रायखोड तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील पाणीपुरवठा विभागामार्फत होत असलेले पाईपलाईन खोली तीन फुटाची असून संबंधित भूतीदाराने तीन फुटा ऐवजी दीड व दोन फूट अशी खोली घेतली आहे मोजमाप पुस्तिकेच्या नियमानुसार काम होत नसल्याने सदरील खोली व आणि पाईपलाईन व पाण्याची टाकी हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून टाकीचे काम करत असताना गावातील सर्व रस्त्याचे वाट लावली आहे रस्त्याचे सर्वत्र रस्ता खराब करून रस्ता उखडून टाकून रस्त्यामधून पाईपलाईन घेतली सी सी रोड उकडलेले अवस्थेमध्ये सोडून पुनर रस्त्याचे काम न केल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी अत्यंत त्रास होतो आहे या गंभीर बाबीची प्रशासन दखल घेऊन संबंधित गुत्तेदार व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा सरपंच यांची सखोल चौकशी करून झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे उपसरपंच शंकर बळीराम धामणवाड यांनी निवेदन उपविभागीय जी प पाणी पुरवठा ऊप विभाग भोकर यांना देऊन तक्रार दाखल केलेली आहे.

Google Ad