भोकर येथील राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेत प्रथम विजेता ठरली ऋतुजा पाटील,द्वितीय धनश्री कदम,तृतीय संकेत पाटील
भोकर( तालुका प्रतिनिधी)येथीलश्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर यांच्या वतीने आयोजित कै.माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्राचा महावक्ता यामध्ये प्रथम विजेती ठरली ऋतुजा पाटील श्री संत ज्ञानेश्वर महाविद्यालय धुपा ता.नायगाव( 31 हजार रु.)द्वितीय धनश्री कदम दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर(21 हजार रुपये) तृतीय संकेत पाटील शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज जि.कोल्हापूर( 11 हजार रुपये)तर सांघिक बक्षीस फिरत्या चषकाचे मानकरी ठरले श्री राजर्षी शाहू विद्यालय लातूर
भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कै.माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा महाराष्ट्राचा महावक्ता या स्पर्धेचे युवकांसाठी वैचारिक जागर आयोजन करण्यात आले होते 20 व 21 डिसेंबर 2023 दरम्यान दोन दिवस ह्या स्पर्धा चालल्या एकूण 35 महाविद्यालयाने यामध्ये सहभाग नोंदविला होता राज्यातील विविध भागातून विद्यार्थी सहभागी झाले होते” आरक्षणामुळे सामाजिक व आर्थिक समस्या मिटतील काय”?हा स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला होतात या विषयावर विद्यार्थ्यांनी सखोल असे मत व्यक्त केले आरक्षणामुळे सामाजिक बदल नक्कीच घडला असे मत काही विद्यार्थ्यांनी मांडले तर आरक्षण मिळून सुद्धा आजही सर्वसामान्य कुटुंबाची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी सुधारली नाही असे मत काहींनी मांडले अतिशय चुरस या स्पर्धेमध्ये आली होती.
20 डिसेंबर 2023 रोजी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी पा.किन्हाळकर,प्रमुख अतिथी सभापती शिरीष देशमुख गोरठेकर,एड.गोविंदराव लामकानीकर,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवानराव दंडवे,सभापती जगदीश पाटील भोसीकर,माजी सभापती बाळासाहेब पा.रावणगावकर,प्रकाश देशमुख भोसीकर,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अत्रिक पा.मुंगल,संचालक रामचंद्र मुसळे,राजेश अंगरवार, एड.शिवाजी कदम,सुभाष पा.घंटलवार, सुभाष पा.गौड,दत्तात्रय पांचाळ,आनंदराव आनंतवाड,मोहन पाटील आदींची उपस्थिती होती मान्यवरांनी शाळेच्या स्तुत्य उपक्रमाबाबत व शैक्षणिक प्रगती बाबत आपले मनोगत व्यक्त केले
भोकर येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कै.माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा महाराष्ट्राचा महावक्ता ही महाविद्यालयीन युवकांसाठी आयोजित करण्यात आली होती “आरक्षणामुळे सामाजिक व आर्थिक समस्या मिटतील काय” हा वादविवाद स्पर्धेचा विषय होता यामध्ये महाविद्यालयिन युवकांनी स्पष्टपणे आपली मते मांडली दोन्ही बाजूंनी विद्यार्थ्यांनी विचारांचा जागर केला प्रथम विजेती ठरलेल्या ऋतुजा पाटील हिस प्रशस्ती पत्र व 31 हजार रुपये,द्वितीय विजेती ठरलेल्या धनश्री कदम हिस 21 हजार रुपये व प्रशस्तीपत्र,तृतीय विजेता ठरलेल्या संकेत पाटील यास 11 हजार रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले व सांघिक बक्षीस फिरते चषक राजर्षी शाहू विद्यालय लातूर यांना मिळाले विजयी स्पर्धकांना संस्थेचे सचिव कैलास देशमुख गोरठेकर व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षक म्हणून पत्रकार बी.आर.पांचाळ,बाबुराव पाटील,सहशिक्षक चंदू चक्रवार यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाहूविद्यालयाचे प्राचार्य संजय सावंत,मुख्याध्यापक जगदंबे, के.एन.किनेवाड,बालाजी काळवणे,राहुल जोंधळे,निलेश चव्हाण व्ही.एन.सर्जे, एच.जी.कुलकर्णी,शेख सलीम यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला