भोकर येथील जी.प.पाणी पुरवठा उपविभागीय कार्यालय वाऱ्यावर
उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता सतत गैरहजर
जलजीवन मिशनची कामे अर्धवट उरकली: गावांना पाणीच नाही
भोकर( तालुका प्रतिनिधी)येथील जि.प.पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय वाऱ्यावरच असून उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता नेहमीच् गैरहजर असल्याने ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली आहेत तालुक्यात जलजीवन मिशनची कामे गावागावात अर्धवट स्थितीत खोदून ठेवल्याने नळाला पाणी येत नाही नळ योजनेचे कामे झाले नाही काही ठिकाणी झालेली कामे अंदाजपत्रकानुसार झाली नसून अर्धवट उरकण्यात आली अशी अनेक गावांची स्थिती झाली आहे.
भोकर येथे तालुकास्तरावर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची देखभाल करण्यासाठी व नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी, उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी,जिल्हा परिषद अंतर्गत पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय आहे मात्र येथील कार्यालयात अधिकारी नेहमीच् गैरहजर असतात उपविभागीय अभियंता हे तीन तालुक्याचा कारभार पाहत असल्याने भोकरला महिनाभरातून एखादेवेळी येऊन जातात,शाखा अभियंता देखील एकच असल्याने ते नेहमीच दौऱ्यावर राहतात,कार्यालयात केवळ दोन कर्मचारी दिसतात त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीची नळ योजना बाबतची कामे वेळेवर होत नाहीत, पुरवठा योजनांची योग्य देखभाल नाही,नवीन नळ योजनांची कामे व्यवस्थित केली जात नाहीत,कामांचा दर्जा राहिलेला नाही निकृष्ट दर्जाची कामे उरकल्या जातात.
*जलजीवन मिशनची कामे अर्धवट: पाणी मिळालेच नाही भोकर तालुक्यातील 48 गावांना जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गावामध्ये पाणीपुरवठा योजना राबवून त्या अंतर्गत हर घर नलसे जल अशी योजना असून दरडोई 55 लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे तालुक्यात जवळपास 75 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाच्या मंजुरी सोबतच नांदेडहून कंत्राटदार देखील आले आहेत,सदर योजनेमध्ये गावात समिती स्थापन करून बँक खाते उघडून योजना सुरू करावयाची आहे मात्र तसे काही झालेले दिसत नाही,काही गावांमध्ये कामाची सुरुवात करण्यात आली,रस्ते खोदुन ठेवण्यात आले मात्र अद्यापही लोकांना पाणी मिळालेच नाही खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे,खोदकाम करीत असताना कमी खोली करण्यात आली,वापरण्यात येणारे पाईपदेखील हलक्या दर्जाचे वापरण्यात आले, कुठे टाकी बांधण्यात आली,तर कुठे काम अर्धवट आहे,झालेले काम हलक्या दर्जाचे झालेले आहे,काही ठिकाणी नळांना कनेक्शन देण्यात आले नाही त्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही अशी अवस्था निर्माण झाली आह
भोकरचे उपअभियंता कार्यालय वाऱ्यावर
जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत अनेक ठिकाणी कामे अर्धवटच राहिलेले असून गावांना पाणी मिळत नसल्याची ओरड सुरू आहे, भोकर येथील जी.प.पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता हे कार्यालयात सतत गैरहजर राहतानाच दिसतात,शाखा अभियंता एकच असल्याने त्यांचा दौराही नेहमी बाहेरच असतो भोकरच्या कार्यालयात मात्र केवळ दोन कर्मचारी बसून राहतात नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी समस्या ग्रामीण भागातील नळ योजनांची स्थिती याबाबत माहिती विचारायची कुणाला हाच प्रश्न निर्माण झाला असून संबंधित अधिकारी का गैरहजर राहतात कुठे काम करतात याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालने गरजेचे आहे