भोकर तालुक्यातील प्रकार खाजगी पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन रक्तचाचणी अहवाल देताना मार्गदर्शक सूचनांना हरताळ बसपा ची चौकशीची मागणी
भोकर ( प्रतिनिधी ) तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी बोगस खाजगी पॅथॉलॉजी लॅबद्वारे रक्त चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णांची लूट केली जाते आता हे लोण तालुक्यातील शहर व ग्रामीण क्षेत्रातही फोफावू लागले आहे प्रशिक्षित मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट नसताना देखील आरोग्य चाचणी अहवाल सर्रासपणे दीले जात असून यात माञ नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.
खाजगी पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून रक्तचाचणी करीत असताना सर्वप्रथम तो मान्यताप्राप्त पदवी व पदविकाधारक आहे का.? तो या क्षेत्रात निष्णात आहे का.? रक्त चाचणीचे रिपोर्ट प्रमाणित असतात का.? याविषयी मात्र संभ्रम आहे.
भोकर शहरातील अनेक पॅथॉलॉजिस्टकडे एमडी पथोलॉजिस्टचे कोरे लेटरप्याड आहेत.ते डॉक्टर कुठे असतात खरेच ते एम डी आहेत का नाहीत याचा पत्ता नसतो.बरेच सुशिक्षित बेकार चार दोन दिवस कुठे तरी प्रॅक्टिस करुन बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खाजगी पॅथॉलॉजी उघडून सर्वसामान्य नागरिकांना गंडविण्याचे धंदे सुरू केले आहेत.यावर कोणत्याही अधिकाऱ्याचे वचक नसल्यामुळे दिवसागणित खाजगी पॅथॉलॉजी ची संख्या बळावत आहे.यातून कधी कुण्या रुग्णांच्या जीवावर बितेल हे मात्र येणारा काळच सांगणार आहे.
भोकर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात बळावलेल्या अनधिकृत खाजगी पथोलॉजींची कसून चौकशी करून संबधीतावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बसपाचे डॉ कैलास कानिंदे यांनी जिल्हा अधिकारी नांदेड ,जिल्हा शल्य चिकीत्सक नांदेड , जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड , उपविभागीय अधिकारी भोकर ,तहसीलदार भोकर वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर , तालुका अधिकारी भोकर यांच्याकडे एका निवेदना व्दारे केली आहे. संबंधीत वरिष्ठ आधिकारी यावर कोणती कार्यवाही करतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र संपर्क होऊ शकला नाही.