जासई विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न.
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई.ता.उरण,जि. रायगड ,या विद्यालयात सन २०२३ – २४ मधील शाळा पातळीवरील विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष,भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते झाले, त्यांनी चंद्रयान रॉकेट या नववी गुरुकुल मधील साहिल पाटील या विद्यार्थ्यांने निर्माण केलेल्या प्रयोगाची कळ दाबून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुण्यांनी प्रयोगांचे निरीक्षण करून शाळेतील बाल वैज्ञानिकांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्या सोबत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हात्रे के.एम, कामगार नेते सोनवणे डी.पी,राजन घरत हे उपस्थित होते.उप मुख्याध्यापिका पाटील एस.एस,रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व वर्गशिक्षक ,विज्ञान शिक्षक ,सर्व सेवक वर्ग व सर्व विद्यार्थ्यांनी हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी केले.