शेवाळी(दा)व धमनार येथे फलक अनावरण-प्रा.मोतीलाल सोनवणे
शेवाळी व धमनार ता.साक्री जि.धुळे येथे सोमवार दिनांक १/१/२०२४ रोजी आदिवासी टोकरे कोळी वाडा व आदिवासी टोकरे कोळी नगर असे आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, आंदोलन प्रमुख आप्पासाहेब नामदेव येळवे,धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे,जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर सोनवणे यांनी फलक अनावरण केले.त्यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार ४७ जमाती आदिवासी मध्ये मोडतात. महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक (२८) कोळी, ढोर, टोकरे कोळी, क्रमांक (२९) कोळी महादेव, डोंगर कोळी, क्रमांक (३०) कोळी मल्हार या नोंदी संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहेत.भारतीय संस्कृती कोश खंड १ व ६ पान नंबर ४२९ व ५२९ नुसार कोळी एक आदिवासी जमात(Tribes) आहे.प्राचीन मध्यपूर्वकाळात आलेल्या प्रोटोआ ट्रलाईड लोकांचे भिल्ल, कोळी, शबर असे वंशज होते असे मानव शास्त्रज्ञांचे मत आहे. भिल हे आदिवासी बरडे भील,नाईक, कोकणा,कोकणी,मावची वळवी, वसावे,पाडवी,पावरा,तडवी, या नावाने ओळखले जातात तर कोळी हे आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या नावाने ओळखले जातात. या आदिवासींच्या ब्रिटिश शासनाने मुंबई ॲक्ट (३)१८७४ प्रमाणे आदिवासी जागले (व्हीलेज सर्वट) हलके गावकामगार म्हणून नेमणुका केलेल्या होत्या. मोबदला म्हणून हक्काने हलके वतन म्हणजे इनाम वर्ग ६ ब देण्यात आले आहे. आदिवासी भिलांच्या जमिनींना भिल ईनाम असे म्हणतात तर आदिवासी कोळ्यांच्या जमिनींना आदिवासी कोळी इनाम किंवा कोयी ईनाम असे म्हणतात. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर आदिवासी अशी नोंद असते. सक्षम प्राधिकार्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरण बंदी-आदिवासी खातेदाराच्या जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ अ प्रमाणे नवीन अविभाज्य सत्ता प्रकार अशी नोंद केलेली असते. सर्व आदिवासींनी जातीचे व वैधता प्रमाणपत्र काढून घ्या त्याशिवाय तुमच्या मुलांना शिक्षण, नोकरी मिळणार नाही अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला युवराज वेंडाईत, गुलाब वेंडाईत, भीमराव वेंडाईत, देविदास वेंडाईत, नानाभाऊ वेंडाईत, कृष्णराव वेंडाईत, अनिल वेंडाईत, रवींद्र वेंडाईत, दिनेश वेंडाईत, रमेश वेंडाईत, संजय सोनवणे, भाऊसाहेब वेंडाईत, सुधाकर वेंडाईत, विठ्ठल वेंडाईत, अजय वेंडाईत, दीपक वेंडाईत, सोमनाथ वेंडाईत, सरपंच सुरेखा साळुंखे, उपसरपंच केतन साळुंखे, माजी सरपंच मच्छिंद्र गायकवाड, माजी सभापती नितीन साळुंखे, दीपक साळुंखे, विकास वाघ, शरद बागुल, सुनित वाघ, सोमनाथ वाघ, सुनील वाघ, गोटू वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.