भोकर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
भोकर (तालुका प्रतिनिधी)स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भोकर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती आश्रमात दि.3 जानेवारी 2024 रोजी साजरी करण्यात आली.स्त्रियांच्या उद्धाराकरिता स्वतः कष्ट शोषून शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती आश्रमातील बालिका व बालिकांनी नाटिका सादर करून अंधश्रद्धे विरुद्ध जागृती केली व शिक्षणाने स्त्रियांचा उद्धार कसा झाला याबाबत सादरीकरण केले,सावित्रीबाईंचे विचार आत्मसात करा असे आवाहन केले,प्रास्ताविक स्मारक समितीचे सहसचिव पत्रकार बी.आर.पांचाळ यांनी करून सावित्रीबाईंच्या कार्याविषयी विचार मांडले यावेळी वनपरिक्षेत्र विभाग भोकर कार्यालयातील वनरक्षक निर्जला धातमोडे यांचा ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास स्मारक समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील सोनारीकर,सहशिक्षक पुरुषोत्तम नाईकवाडे,अवधूत राजुरे, सौ.वनिता पांचाळ, सौ.मंगला राजुरे यांच्या सह बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते