तलाठी भरती मध्ये झालेल्या घोटाळयाची SIT मार्फत चौकशी करणे..तालुका अध्यक्ष युवा काँग्रेस जिल्हा नांदेड आत्रिक पाटील मुंगल,सचिव माधव पाटील बोरगांवकर,. यांची मागणी..
भोकर तालुका प्रतिनिधी: भोकर उपविभागीय अधिकारी यांना युवक काँग्रेस च्या वतीने निवेदन नुकतीच तलाठी भरती परिक्षा महाराष्ट्र शासनाने TCS कंपनीकडे दिली होती. आणि ऑन लाईन पेपर झाले असून यामध्ये अनेक गैर प्रकार झालेले आहेत. या परिक्षेत गुणवत्ता नसतानाही सुध्दा विद्यार्थ्यांना २०० पेक्षा अधिक गुण पडलेले आहेत. उदा. वनरक्षक पदाच्या परिक्षेमध्ये १२० पैकी ५४ मार्क आणि तलाठी परिक्षेमध्ये २०० पैकी २१४ गुण मिळाले. ज्या विद्यार्थ्याला स्पर्धा परिक्षा कधीच दिली नाही या तलाठी परिक्षेत टॉपर आहेत. TCS कंपनीने नॉर्मलायजेझन गुणाचे केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शंका निर्माण झालेली आहे. TCS कंपनीने प्राप्त गुण आणि वाढलेले गुण यांची नवीन यादी लावली पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना मनातली शंका दूर होईल. परिक्षेच्या दरम्यान काही सेंटर वरती गैरप्रकार घडलेले आहेत. कॉपी बहाद्दरांना पकडले आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे.जे जे मेरिट आहेत. त्यांची CCTV फुटेज तपासली पाहिजेत. या परिक्षेमध्ये अनेक गरिब विद्यार्थी अभ्यास करतात. काही विद्यार्थ्यांचे नौकर राहून, शेती गहाण ठेवून, रोजंदारी करून स्पर्धा परिक्षेची तयारी करतात. या विद्यार्थ्यांवर आशाच प्रकारे महाराष्ट्र सरकार अन्याय करत असेल तर युवक काँग्रेस खपवून घेणार नाही. जर चौकशी केली नाही तर युवक कॉग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.अशी मागणी आंत्रिक पाटील मुगल यांनी आज युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष: श्री.मा.आत्रिक पाटील मुंगल बेंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी भरती मध्यें झालेल्या घोटाळ्या ची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी.आणि दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन. तहसिलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले.युवक कांग्रेस चे सर्वं पदाधिकारी यावेळी : तालुका सचिव गणेश यादव तालुका शहर अध्यक्ष: श्रीकांत दरबस्तवार युवक चे शहर अध्यक्ष: सुजित कोंडलवार,सचिव माधव पाटील बोरगांवकर,सचिव नामदेव कोरंटलू,नीळकंठ वर्षेवार संतोष गागदे, ,युवक कांग्रेस चे उपाध्यक्ष मोघाळीचे मा.सरपंच धनराज पाटील, कामनगावचे सरपंच राघोबा पाटील सोळंके, शहर उपाध्यक्ष आनंद दादा ढोले,तालुका युवक उपाध्यक्ष सुनिल पाटील मातुळकर,विद्यार्थी कांग्रेस चे तालुकाध्यक्ष :विठ्ठल पाटील धोंडगे युवक काँग्रेस चे सोशल मिडिया अध्यक्ष श्रीधर जाधव युवक तालुका सचिव साई पाटील येलुरे आदी योगेश हाळदेकर, संदीप येलुरे.युवक कांग्रेस च्या पदाधिकारी व असंख्य कार्यकर्तच्या स्वाक्षऱ्या आहेत.