भोकर येथे सभापती राहूल नार्वेकर यांच्या प्रतिमात्मक फलकास जोडे मारुण शिवसैनीकानी केला निषेध
भोकर – घटनेतील न्यायिक पदावर बसुन दुसऱ्याने लिहुन दिलेली स्क्रिप्ट वाचत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे सह १६ आमदार पात्र ठरवत शिवसेना व चिन्ह शिंदेंना दिले. योग्य न्याय न देता भ्रमित असा निकाल देणार्या सभापती राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमात्मक फलकास भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोडे मारत,काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला.यावेळी शिवसैनीकानी नार्वेकर व भाजप-शिंदे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने केली.
सत्ता संघर्षाचा पात्र अपात्र यांचा निर्णय दि. १० जानेवारी रोजी विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.यात शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून कोणतेही आमदार अपात्र नाही असा निर्णय दिला.यावेळी जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ व जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर यांनी बोलताना म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांचे गटनेते पद व भारत गोगावले यांचे प्रकृत पद अवैध ठरवले होते मात्र नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे पालन न करता त्यांच्या नियुक्ती वैद्य ठरवत सुप्रीम कोर्टाचा अपमान केला बाळासाहेबांची शिवसेना सुरत गुहाटी ला पळून गेलेल्या गद्दाराच्या घशात घालण्याचे काम नारळीकर यांनी केले पण खरी शिवसेना ही जनतेच्या न्यायालयातच ठरणार आहे जनतेने धडा शिकवावा निकाल काही लागला तरी आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी ठाम उभे आहोत असे त्यांनी सांगितले.या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील जनता अचंबित झाली.तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून तीव्र निषेध करण्यात आला. राहुल नार्वेकर एका घटनेतील मुख्य पदावर कार्यरत राहुन योग्य निर्णय न देता कोणीतरी दिलेली स्क्रिप्ट वाचुन निर्णय दिला. असा निर्णय लोकशाहीत घातक असुन अशा दुर्दैवी निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी भोकर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सभापती राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेस आंबेडकर चौकात जोडे मारुण आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ, उपजिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर, तालुका प्रमुख संतोष आलेवाड, शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, उप तालुका प्रमुख संभाजी पोगरे, रमेश महागावकर, गंगाधर महादावाड, राजेश पोगरे ,माधव सोनारीकर,दिव्यांग तालुका प्रमुख विठ्ठल देवोड, विशाल बुध्देवाड, पांडुरंग कटकमवाड सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.