एसटी डेपो नांदेड आगार येथेरस्ते सुरक्षितता अभियानाला सुरुवात

नांदेड- रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा भाग असून रस्ते अपघात हा जीवन-मरणाचा
जिव्हाळ्याचा प्रश्न असून एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासासाठी अनेक उपक्रम वेळोवेळी राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागाच्या एसटी डेपो नांदेड आगार येथे दि. ११जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठिक १० वाजता सुरक्षितता अभियान दि. ११ ते २५ जानेवारी २०२४ सुरक्षितता मोहीमेला सुरुवात केली असून याचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भूषण राठोड यांच्या फित कापून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक अशोकराव चव्हाण हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वजिराबाद पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड,
आरटीओ कार्यालयाचे अधिकारी अमर पायघन, शिवहारी गायकवाड, एसटी चे विभागीय यंत्र अभियंता (चालन)
मंगेश कांबळे, उपयंत्र अभियंता निलेश तागड, विभागीय वाहतूक अधिक्षक कमलेश भारती, आगाराचे सहाय्यक
कार्यशाळा अधीक्षक संदीप गादेवाड, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, चार्जमन श्रीनिवास रेणके, विष्णू
हारकळ, लेखाकार सतीश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत
एच. मिसलवाड, वाहतुक निरीक्षक शेख मोबीन यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भूषण राठोड यांनी उद्घाटकीय भाषणात म्हणाले की, वाढती जनसंख्या व वाहनांची संख्या पाहता सर्वांनीच वाहतुकीचे नियम पाळून हेल्मेटचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन करुन कामगार- कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, आपले वाहन सुस्थितीत ठेवून वाहन चालवताना समान वेग मर्यादा ठेवून स्वतःसहीत इतर सर्वांचीच काळजी घेऊन वाहने
चालवल्यास नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होतील असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी मंगेश कांबळे, प्रदीप राठोड यांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप अशोकराव चव्हाण यांनी करुन आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन यासीन हमीद खान यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी शिंदे, सुरेश फुलारी, संदीप जेट्टी, सौ.श्वेता तेलेवार, रेखा माचीनवार, कृष्णा पवार, तिरुपती लुंगारे, संदीप देशमुख,गुलाम रब्बानी आदींनी परिश्रम घेतले.यावेळी आगारातील कामगार- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad