रोहीपिंपळगाव येथेल एका सहा वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या
मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील एका सहा वर्षीय चिमुकलीवर हत्या करून रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आल्याची दुर्दैवी घटना दिनांक 14.1.2024 रोजी घडली असून ती मुलगी इयत्ता पहिली मध्ये शिकत होती आणि तिच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ना बालक व निष्पाप चिमुकलीचा बळी घेतला आहे. मृत मुलीचे नाव प्रिया निरंजन शिंदेअसून ती नेहमीप्रमाणे रस्त्यावर खेळत होती त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी काहीतरी आमिष दाखवून पळून नेले ही माहिती वडिलांना कळताच वडील मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन सदर घटनेची तक्रार केली आहे तक्रार केल्यानंतर दरम्यान नातेवाईक आणि पोलिसांकडून त्या बालिकेचा शोध चालू ठेवला होता मात्र ती बालिका त्यावेळी सापडली नाही सोमवारी सकाळी एका बालिकेचा मृतदेह मुदखेड येथील उमरी रस्त्याच्या लगतच्या खड्ड्यात काही नागरिकाला दिसून आला त्या दरम्यान ती माहिती पोलिसांना कळविण्यात आली आणि सदर बालिकेची माहिती पटवून देण्याकरिता पोलीसानी नातेवाईकांना बोलावून त्या मृतदेहाची खात्री केली त्यावेळी रोहीपिंपळगाव येथील प्रिया निरंजन शिंदे असल्याचे खात्री झाली सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्यासह पोलीस निरीक्षक वसंत सप्रे घटनास्थळी भेट दिली आणि तपासणीला गती दिली मकर संक्रांतीच्या दिनी दुर्दैवी घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान नातेवाईकांना या बालिकेचा खून केला असावा असा पोलिसाचा अंदाज दिसून आला आहे आणि पोलीस ठाण्यात वृत्त लीही पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बालिकेवर अत्याचार करून खून केला असावा असा अंदाज वरती उन्हात आला उर्वरित तपासणीसाठी मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे वैद्यकीय तपासणीनंतर सत्य उजेडात येईल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक श्री खंडेराय धरणे व पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी दिली आहे ही घटना अतिशय हृदयाला पिळऊन टाकणारी घटना असून. सदर घटनेमुळे रोहीपिंपळगाव व परिसरातील सर्वत्र ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मुदखेड तालुक्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुःख व संतापाची लाट असल्याचे दिसून येत आहे. या निष्पाप व नाबालक चिमुकलीवर हत्या करणाऱ्या संबंधितावर पोलीस प्रशासनाने गांभीर्य पूर्वक लक्ष देऊन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यादृष्टीने आरोपपत्र दाखल करण्यात यावे आणि आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आता सर्वत्र ठिकाणाहून होताना दिसून येत आहेत.