वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयवर अन्नत्याग चा धडक मोर्चा.. हक्कासाठी पुकारला आदिवासींनी “एल्गार”
वाशिम : आदिवासी समाजातील
कोळी महादेव,डोंगर कोळी,कोळी
मल्हार, कोळी ढोर आणि टोकरे कोळी
या अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट
घटकाच्या विकासाकडे शासनाने
सातत्याने दुर्लक्ष केले.वारंवार
पाठपुरावा करूनही शासन दखल घेत
नसल्याने अखेर संवैधानिक अधिकार
व हक्कांसाठी आदिवासींनी ‘एल्गार’
पुकारला आहे. १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या पंडळींनी २३जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्धार केला.निवेदनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार,८३ नंतर आदिवासी विकास भागाने संविधानाच्या मूळ हेतूला देणारे व अनुसूचित जमातीस जाचक ठरतील,असे विविध संदिग्ध शासन निर्णय पारित केले.विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती कै.दाजीबा पर्वत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीने हे सर्व शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची शिफारस केली;मात्र १९८६
पासून आजपर्यंत शासनाने यासंबंधी
कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. हा
अन्याय आता सहन करण्यापलीकडे
गेल्याने संवैधानिक अधिकार व हक्क
मिळविण्यासाठी २३ जानेवारीपासून
अन्नत्याग आंदोलन करीत असल्याचे
निवेदनात नमूद आहे.जिल्ह्यातील सर्व ठिकाणी वास्तव्यास असलेले आदिवासी या आंदोलनात शेकडोच्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.कोणत्या मागण्यांसाठी
पुकारले आंदोलन?अर्जदाराच्या पुराव्यांमधे कोळी,हिंदु कोळी,सुर्यवंशी कोळी, अशी नोंद
आढळली तरी कोळी महादेव, डोंगर
कोळी, कोळी मल्हार,कोळी ढोर,
टोकरे कोळी यापैकी ज्या जमातीचा
दावा केला असेल, त्या अनुसूचित
जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
याशिवाय इतर स्वरूपातील १०
मागण्यांचा समावेश करण्यात आला
आहे.१९७६ चा कायदा
अंमलात आणा
■ १८ सप्टेंबर १९७६ रोजी पारित
झालेला अनुसुचित जाती, जमाती
आदेश (सुधारित) कायदा
जसाच्या तसा अंमलात आणला
जावा.
■ यासाठी राज्य शासनाने तात्काळ
गॅझेटिर प्रसिध्द करण्याबाबत
जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे
प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी
करण्यात आली.