रामकथा ही मनुष्याच्या जीवनाची व्यथा दूर करणारी आहे- रामायणाचार्य ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे
भोकर मध्ये मंगल कलश शोभायात्रेने रामकथेला प्रारंभ
भोकर (तालुका प्रतिनिधी)रामायण जेव्हा खरे जीवनात उतरते तेव्हा आनंद मिळतो,प्रत्येकाच्या अंतकरणाची ती कथा आहे,रामायण ही कथा मनुष्याच्या जीवनाची व्यथा दूर करणारी आहे असे आध्यात्मिक विचार रामायणाचार्य ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे आळंदी यांनी भोकर येथील श्रीराम कथा सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
श्रीराम मंदिर जीर्णोधार ,श्री लामलला मूर्तीची प्राणप्रिष्ठा,व छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या स्वराज्याभिषेक दिनानिमित्त दि.17 ते 21 जानेवारी 2024 दरम्यान भोकर येथील माऊली धाम नवा मोंढा येथे भव्य संगीतमय श्री रामकथा यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पहिल्या दिवशी दि.17 जानेवारी रोजी कथेच्या प्रारंभी श्री बालाजी मंदिर येथे ग्रंथाचे पूजन करून रामचरितमानस ग्रंथाची शहरातून भव्य मंगल कलश शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर भव्य अशा मंडपामध्ये कथेला प्रारंभ झाला रामायणाचार्य ह.भ. प.शिवाजी महाराज वटंबे यांनी रामायण हा ग्रंथ पवित्र आणि सुरस आहे असे सांगून पाचशे वर्षापासून ज्या योगाची वाट आपण पाहत होतो ते मंदिर निर्माण झाले आहे यासाठी अनेकांनी बलिदान दिले,त्यांच्या कर्तव्यामुळे राम जन्मभूमीवर मंदिर होत आहे,हे बलिदानाचे प्रतीक आहे,आता सर्वांनी एकत्र येऊन संघटित होणे काळाची गरज आहे, आज आपल्या जीवनात भौतिक सुख खूप झाले मात्र अंतकरणाची माणसं लांब गेली, रामायण जगावं कसं हे शिकवतं,बंधुप्रेम,मात्रप्रेम,पितृप्रेम रामायणातून शिकावं, चरित्र जेव्हा संपते तेव्हा समाजाची,देशाची,धर्माची,अधोगती होते,चरित्र अतिशय महत्त्वाच आहे,समाजासाठी जे जगतात त्यांचे चरित्र गायले जाते,संपत्ती असणारे यांचं चरित्र गाईले जात नाही, समाज परिवर्तनासाठी संतांची खरी गरज आहे,संतांकडे श्रीमंती नव्हती मात्र सामाजिक कार्य महान होते,महाराष्ट्रामध्ये जिवंत असलेल्या माणसाची किंमत केली जात नाही मेल्यानंतर त्यांची किंमत कळते असे सांगून शिव महात्म्य व शिव विवाह सोहळ्याची कथा महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून सांगितली.वाद्यवृंद व संगीताची साथ आणि सुंदर गायन यामुळे कथेला मोठा आनंद येत आहे.