भोकर येथे आर.सी.सी.इमारत बांधकाम गुतेदार कामगार संघटना ची नव्याने निवड व म्हत्वाचे मार्गदर्शन बैठक…
भोकर तालुका प्रतिनिधी: भोकर सी,सी, इमारत बांधकाम गुतेदार कामगार संघटना बैठक या बैठकीत नवीन निवडी करण्यात आल्या व या संघटनांच्या माध्यमातून कुटुंब हक्क साठी व कामगार हक्कासाठी कार्य केले जाईल
भारतीय कामगार चळवळीचा इतिहास महात्मा जोतिराव फुले यांच्या काळापासून सुरू होतो. महात्मा फुल्यांचे शिष्य नारायण मेघाजी लोखंडे यांनी तसेच महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार चळवळीत सहभाग नोंदविला.स्वातंत्र्याची चळवळ व कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी कामगार संघटना म्हणून भोकर आर, सी,सी, इमारत बांधकाम गुतेदार कामगार संघटना ची सुरुवात आज दि.18/01/2024 रोजी गुरूवार स्थळ सुपर गॉडन भोकर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व स्वागत व सत्कार नवीन पद निवडी इजिंनियर अकीब शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर बैठकीचे मार्गदर्शन म्हणून लाभलेल्या मा.इब्राईम कुरेशी मा.फेयाज आली शेख.मा.राजापुरकर साहेब यांची उपस्थिती लावली.आपण सर्व एकत्र येऊन काम करावे.घर बांधण्यापूर्वी त्यासाठी किती खर्च येईल हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. यात बांधकाम, त्याचे वेळापत्रक आणि खर्चांची विभागणी यांचा समावेश होतो,ज्यात तुमच्या गरजांनुसार बदल करू शकता.आणि आपण कामगार संघटना एकमेकांना समजून घेऊन एकमेकांनच्काया सहकार्याने काम केले पाहिजे असे आर.सी.सी.इमारत बांधकाम गुतेदार कामगार संघटना.चे प्रमुख व दिगांबर कांबळे बोलतांना सांगितले आहे .यावेळी उपस्थित अध्यक्ष दिगांबर कांबळे उपाध्यक्ष.वाजीद शेख
सचिव.बाबा शेख. कोषाध्यक्ष
साहेबराव पवळे उपकोषाध्यक्ष मो.सिदीख सल्लागार शंकर कोरंटलू. सल्लागार
संतोष गागदे बोरगाव व सर्व संघटना पद अधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पाटील सुर्यवंशी.व आभार प्रदर्शन रंगराव पाटील यांनी केले.