संत समाजाला जोडण्याचं काम करतात- ह.भ.प.वटंबे महाराज
भोकर मध्ये श्रीराम कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भोकर (तालुका प्रतिनिधी)संसारात तापलेल्या जीवाला शांती देणारी रामकथा आहे,जगण्याचं मार्गदर्शन कथे मध्ये आहे,संत सर्वांना सोबत घेऊन चालतात,संतांनी समाजाला जोडण्याचं काम केलं आहे असे आध्यात्मिक विचार रामायणाचार्य ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे आळंदी यांनी भोकर येथील राम कथेत बोलताना व्यक्त केले.भोकर येथे माऊली धाम मोंढा मध्ये श्री रामकथेचे आयोजन 17 जानेवारी 2024 पासून करण्यात आले असून चौथ्या दिवशीच्या कथा प्रसंगात ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे बोलताना म्हणाले देव जिथे आहे तिथे आनंद आहे,क्रोध माणसाच्या जीवनाला घातक आहे,म्हणून सर्वांशी प्रेमाने व गोड बोला,प्रेमाने रहा,श्री रामप्रभू सर्वांचे आहेत कुण्या एकट्याचे नाहीत,आपण मात्र संत वाटून घेतलेले आहेत,तुकोबा ते चोखोबा हे सर्व संत एकाच विचारांचे होऊन गेले,वारकरी संप्रदाय सगळ्यांना घेऊन चालणारा आहे रामायणामध्ये बापाचं प्रेम काय असते ते कळतं,आजही बाप जीवनभर मुलींसाठी मुलांसाठी झुरतो आहे तो रात्रंदिवस राबतो आहे,अंगावर फाटके कपडे घालतो आहे,सासूला सून जेव्हा मुलगी वाटते आणि सुनेला सासू जेव्हा आई वाटते तेव्हा संसारात खरे सुख निर्माण होईल,श्रीमंत असणारी मुलेच आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत आहेत,दुसऱ्याचा सन्मान करायला शिका,जेव्हा दुसऱ्याला आपण मोठ करायला शिकतो तेव्हा आपणही मोठे होतो,दुखाने घाबरून जाऊ नये व सुखाने उन्मत होऊ नये, मनातून कधीही खचून जाऊ नका,परमेश्वराचे भजन करा,पांडवांनी ईश्वराचे चिंतन कधीच सोडलं नाही, असे सांगून श्री रामचंद्र प्रभूंच्या विवाहाची कथा सांगण्यात आली कथेला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून महिलांचे उपस्थिती लक्षणीय आहे कथा प्रसंगातील विविध देखावे आणि संगीतमय भजन यामुळे भक्तिमय वातावरण तयार झाले आहे