डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच एका नवजात अर्भकाचा मृत्यू, पित्याची पोलिसात तक्रार
भोकर प्रतिनिधी / येथील एका खासगी रुग्णालयातील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेच्या गर्भात असलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पतीने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
ही घटना दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात माहिती असे की, तक्रारदार परसराम बोईनवाड यांनी पत्नी अन्नपूर्णा रामणबोईनवाड हीस येथील सरस्वती हॉस्पिटल येथे प्रसूतीसाठी सकाळी १०.०० वाजता दाखल केले होते. येथील डॉक्टर सौ मनीषा देशमुख माने यांनी दिवसभर ‘त्या’ गरोदर मातेस रुग्णालयात थांबवून प्रस्तुती नॉर्मल होईल असे सांगून ताटकळत ठेवले. अखेर गरोदर त्या महिलेस अधिकचा त्रास होत असल्याने भीती निर्माण होऊन डॉक्टरांच्या मर्जीच्या विरुद्ध नजीकच्या संजीवनी हॉस्पिटल येथे हलविले. येथील डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचा निर्वाळा देताना एक तास अगोदर आले असते तर कदाचित बाळ वाचू शकले असते असे डॉक्टरांनी सांगीतले. नातेवाईकांच्या परवानगीनंतर संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वीरीत्या बाळास मातेच्या उदरा बाहेर काढून महीलेस जीवदान दिले. दरम्यान सरस्वती रुग्णालयाच्या डॉक्टर मनीषा माने यांनी योग्य उपचार दिले नाहीत डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार व दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला नसल्यामुळेच बाळाचा मृत्यू झाला असा पतीने आरोप केला आहे पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे अर्भकाच्या मृत्यूचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर डॉक्टर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस निरीक्षक मारकड यांनी संयमाने भूमिका घेत याप्रकरणी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करून प्रकरण संयमाने हाताळले नागरिकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे होणाऱ्या मृत्यूंवर तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे.
तक्रारीची दखल न घेतल्यामुळेच की काय हे गंभीर प्रकरण समोर आले :- रिपाई
काही दिवसांपूर्वी रिपाईचे मनोज शिंदे यांनी भोकर येथील खाजगी डॉक्टर विरुद्ध तक्रार केली होती परंतु शासन प्रशासनाने या तक्रारीची दखल न घेतल्यामुळेच की काय हे गंभीर प्रकरण समोर आले आहे या निमित्ताने तरी खाजगी दवाखान्यांची चौकशी होईल काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.