उमरी मध्ये मुसळधार पाऊस व गारा..उमरी व हिमायतनगर तालुक्यात तुफान गारपीट ; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला.
उमरी – उमरी व हिमायतनगर तालुक्यात दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता दरम्यान अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्याने, तालुक्यात सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. या तुफान गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक ११ फेब्रुवारी तालुक्यात सर्वत्र तुफान गारपीट झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाश्यांनी आपला जीव मुठीत धरत आजूबाजूचा आधार घेतला. आणि शेतातील शेतकऱ्यांनाही यामुळे दुखापत झाली असून शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, तूर यासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतात उभा असलेला गहू पडला असून ऐन उमेदीच्या वेळी गारपीट झाली असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास या गारपिटीने पळवला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या श्रमाचे मातीमोल झाले आहे. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. बळीराजाला शासनाकडून मदत मिळणे आवश्यक आहे.